दहशतवाद्यांच्‍या टार्गेटवर असणार्‍या अभिनेत्री अमरीन भट्ट काेण हाेत्‍या?

दहशतवाद्यांच्‍या टार्गेटवर असणार्‍या अभिनेत्री अमरीन भट्ट काेण हाेत्‍या?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू- काश्मीरमधील टार्गेट किलिंगचे सत्र सुरुच आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन यांच्या भाच्यावरही गोळ्या झाडल्या. बडगाम जिल्ह्यातील चदुरा गावातील हिशरू भागात ही घटना घडली. अमरीन घराबाहेर आपल्या भाच्यासह उभ्या असताना  दहशतवादी आले आणि बेछूट गोळीबार केला. जाणून घेवूयात अमरीन भट्ट कोण हाेत्‍या ते.

अभिनेत्री आणि गायिकाही

अमरीन भट (वय ३५) या काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हाेत्‍या. अभिनयासोबत त्‍या  उत्‍कृष्‍ट गायिकाही हाेत्‍या. सोशल मीडियावर त्‍या वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर करत असते. अमरीन यांच्या गाण्यांच्‍या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. नवनवीन गाण्याच्या व्हिडिओमुळे त्‍या  प्रकाशझोतात आल्‍या हाेत्‍या.

दहशतवाद्‍यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांची १३ मे रोजी पुलवामा येथील निवासस्थानी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर सरकारी कर्मचारी राहुल भट यांची बडगाम येथील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या दोन्ही घटनांनंतर अमरीनची पुन्हा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news