नाशिक : पीओपी मूर्तींवर बंदीचे अंनिसने केले स्वागत | पुढारी

नाशिक : पीओपी मूर्तींवर बंदीचे अंनिसने केले स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाने गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदरच पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या भूमिकेचे महाराष्ट्र अंनिसतर्फे स्वागत केले आहे.

धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरातून गोदावरी वाहते. धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून पीओपीने घडविलेल्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करणे आणि निर्माल्य व तत्सम पूजेच्या वस्तू गोदावरीत सोडण्याकडे भाविकांचा कल दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे नदीचे आणि एकूणच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत होते. विसर्जित गणेशमूर्ती दान मिळविणे व त्यासोबतचे निर्माल्य संकलन करण्याची मोहीम महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रात ठिकठिकाणी हाती घेतली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये प्रथमच 1997 साली गोदावरीकाठी 102 विसर्जित गणपतीच्या मूर्ती दान मिळाल्या. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन पावणेतीन लाख मूर्ती संकलन करण्यापर्यंत पोहोचली. यात अंनिससह इतर पर्यावरणवादी, परिवर्तनवादी संस्था, संघटना, मनपाचा आरोग्य व स्वच्छता विभाग, हरित सेना, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींचे मोठे योगदान आहे. अंनिसने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा:

Back to top button