नगर : 32 हजार एलईडी बसूनही अंधार: आणखी चार हजाराची गरज! | पुढारी

नगर : 32 हजार एलईडी बसूनही अंधार: आणखी चार हजाराची गरज!

नगर : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने शहरात 32 हजार स्मार्ट एलईडी पथदिवे बसविल्याचा दावा केला असला, तरी अजूनही शहराचा बहुतांश भाग अंधारात आहे. शहराचा अंधार घालविण्यासाठी आणखी चार हजार स्मार्ट पथदिव्यांची आवश्यकता असल्याची मागणी पुढे आली आहे. 32 हजारांतील अनेक दिव्यांना वीजजोडणीची वायर नसल्याने ते बंद स्थितीत आहे. महापालिकेकडून वायरचा पुरवठा होत नसल्याने पथदिव्यांची जोडणी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वीजबिलात बचत करणारे स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीने स्मार्ट एलईडी प्रकल्पास मंजुरी दिली. निधी मंजूर झाल्यानंतर अनेक दिवस पथदिवे बसविण्याच्या कामाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर पथदिवे बसविण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला. अन् सहा महिन्यांत मध्य शहर, सावेडी, बोल्हेगाव, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव, केडगाव भागात सुमारे 32 हजार स्मार्ट एलईडी पथदिवे बसविले गेले.

दरम्यान, पथदिव्यांच्या उजेडाचे नाट्य घडले. महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनीच पथदिव्यांचा बसविण्यात आले. अद्यापही काही ठिकाणी पथदिव्यांचा उजेड कमी पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती संबंधित कंपनीने हाती घेतली आहे. अनेक ठिकाणच्या पथदिव्यांची वीज जोडणी बाकी आहे. कारण, त्याला जोडणी देण्यासाठी वायरची नाही. महापालिकेकडे वायर शिल्लक नसल्याने काम ठप्प असल्याचे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले. दरम्यान, आणखी चार हजार पथदिव्यांची मागणी नागरिकांकडून पुढे आल्याचे समजते.

मालवण : स्कुबा डायव्हिंग बोट मालक, चालकासह 7 जणांना अटक

वायरचा प्रस्ताव धुळखात पडून

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यासाठी नागरिकांकडून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. मात्र, पथदिवे जोडणीसाठी वायरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी विद्युत विभागाने महापालिकेकडे दोन वेळा प्रस्ताव देऊनही तो प्रस्ताव धुळखात पडून आहे. त्यामुळे अनेक भागातील स्मार्ट एलईडी पथदिव्यांची जोडणी रखडली आहे.

दिव्यांचे 50 वर्षांचे आयुर्मान

शहरात नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट एलईडी दिव्यांना 50 वर्षांचे आयुर्मान आहे, तर विजेची बचत होणार असल्याने महापालिकेचा आर्थिक फायदा होणार आहे.

रहदारीप्रमाणे दिवे

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविताना त्या परिसरातील रहदारीचा विचारून बसविण्यात आले. राज्य मार्ग, मुख्य रस्ता, उपरस्ता, कॉलनीतील अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार 24, 36, 45 व 60 वॉटचे दिवे बसविण्यात आले.

हेही वाचा

Back to top button