Harshaali Malhotra: ‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी आता इतकी सुंदर..

Harshaali Malhotra: ‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी आता इतकी सुंदर..
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सुपरहिट ठरला हाेता.  'बजरंगी भाईजान' या चित्रपटात सलमानसोबत एका पाकिस्तानी मुलगी 'मुन्नी'ची भूमिका बालकलाकार हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) हिने साकारली हाेती. हा चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता. सध्या या चित्रपटातील मुन्नी म्हणजे, हर्षाली मल्होत्रा खूपच सुंदर दिसत आहे.

हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra)  सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो शेअर करत असते.

इंन्स्टाग्रामवरील फोटोत ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. याशिवाय मुन्नीचे डान्स करतानाचे व्हिडिओदेखील पाहायला मिळतात. हर्षालीचे इंस्टाग्रामवर सध्या १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

मुन्नी म्हणजे, हर्षाली १३ वर्षाची झाली

बजरंगी भाईजान चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता आणि तेव्हा मुन्नी म्हणजे, हर्षाली ७ वर्षांची होती. नुकतेच हर्षाली आता आपला १३ वा वाढदिवस साजरा केला आहे.

गेल्या ६ वर्षात हर्षालीचा लूकमध्ये बद्दल झाला आहे.

चित्रपटात लहान दिसणारी मुन्नी आता सोशल मीडियावर सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंनी चाहत्यांना भारावून सोडले आहे.

हर्षाली मल्होत्राने बजरंगी भाईजान या चित्रपटात पाकिस्तानातील एका आवाज नसलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात मुन्नी रस्ता चुकते आणि पाकिस्तानातून भारतात येते. तिला बोलता येत नसल्याने पत्ता सांगणे देखील कठीण होवून बसते.

अशा परिस्थितीत भारतातील बजरंगी भाईजान म्हणजे, सलमान खान तिच्या मदतीला येतो आणि मुन्नीला पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी मदत करतो असे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

सलमानचा बजरंगी भाईजान चित्रपट सुपरहिट ठरला हाेता. यातील खास म्हणजे, मुन्नीची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली.

या भूमिकेसाठी हर्षालीला स्क्रीन अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला होता.

सोशल मीडियात हर्षाली धुमाकूळ घालत आहे.

बजरंगी भाईजान  याचित्रपटाआधी हर्षालीने अनेक मालिकेत काम केले आहे. यात 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि 'सावधान इंडिया'चा समावेश हाेता.  सुमारे १००० मुलींची ऑडिशन घेतल्यानंतर या चित्रपटासाठी हर्षालीची निवड झाली होती.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news