देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.८३ टक्क्यांवर! - पुढारी

देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.८३ टक्क्यांवर!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.८३ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या दोन दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांहून कमी नोंदवण्यात येत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी दिवसभरात १८ हजार ८७० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३७८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

दरम्यान २८ हजार १७८ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.८३ टक्के नोंदवण्यात आला.

मंगळवारी आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी एकट्या केरळमध्ये ११ हजार १९६ कोरोनाबाधित आढळले, तर १४९ रूग्णांचा मृत्यू झाला. असे असले तरी राज्यांतील स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे.

देशातील एकूण ३ कोटी २९ लाख ८६ हजार १८० रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २ लाख ८२ हजार ५२० रुग्णांवर (०.८४%) उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ४७ हजार ७५१ रूग्णांचा कोरोना बळी घेतला.

कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीचे ८७ कोटी ६६ लाख ६३ हजार ४९० डोस लावण्यात आले आहेत.

यातील ५४ लाख १३ हजार ३३२ डोस मंगळवारी लावण्यात आले. केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ८५ कोटी ४२ लाख ३५ हजार १५५ डोस पुरवले आहेत. यातील ४ कोटी ५७ लाख ९८ हजार १२० डोस अद्यापही राज्यांकडे शिल्लक आहेत. येत्या काळात ८३ लाख ८० हजार १४० डोस पुरवण्यात येतील, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

देशात आतापर्यंत ५६ कोटी ७४ लाख ५० हजार १८५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १५ लाख ५ हजार ७१३ तपासण्या मंळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

बुधवारी देशाचा आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १.८३ टक्के नोंदवण्यात आला,तर दैनंदिन कोरोना संसर्गदर १.२५ टक्के नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

NEET EXAM : झालेली नीट परिक्षा रद्द करावी ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Back to top button