IIFFB २०२१ मध्ये सुमित राघवन सर्वोत्कृष्ट अभिनेता

IIFFB २०२१ मध्ये सुमित राघवन सर्वोत्कृष्ट अभिनेता
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : 'इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन २०२१' (IIFFB २०२१) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नामांकने जाहीर झाली आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या 'एकदा काय झालं…' चित्रपटाला विविध तीन विभागांमध्ये नामांकन मिळाले.

'एकदा काय झालं…' या चित्रपटाला IIFFB २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट गीत या तीन विभागांमध्ये नामांकन मिळाली. त्याशिवाय 'शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२१'साठीसुद्धा 'एकदा काय झालं…' चित्रपटाची निवड झाली आहे.

गजवदना' प्रॉडक्शन्स' आणि 'शोबॉक्स एंटरटेन्मेंट'ची निर्मिती हा चित्रपट आहे. 'एकदा काय झालं…' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

सुमित राघवन सर्वोत्कृष्ट अभिनेता

'इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन २०२१'साठी सुमित राघवनला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले. सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून अर्जुन पूर्णपात्रेला तर 'रे क्षणा…' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताचे नामांकन मिळाले.

हे गाणे शंकर महादेवन यांनी गायिले आहे. सलील कुलकर्णी यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी हे गाणे लिहिले आहे.

डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले- 'एकदा काय झालं…' संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासाठीचा चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटगृहे खुली होण्याची वाट पाहत आहोत. सध्या कोविड-१९च्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. निर्माते व दिग्दर्शक म्हणून मी एकत्रित मिळून प्रदर्शनासाठी थांबायचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाचे नामांकन विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये होत आहे. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. चित्रपटगृहे लवकरच सुरु होतील. हा चित्रपट आपल्या सर्वांना लवकरच पाहायला मिळेल, याची आम्ही वाट पाहत आहोत. असे उद्गार चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी काढले.

चित्रपटातील बालकलाकाराविषयी सलील कुलकर्णी म्हणाले, प्रमुख भूमिकेतील अर्जुन पूर्णपात्रेची निवड तब्बल १५०० मुलांच्या चाचणीतून केली गेली. हा मुलगा जळगाव येथील चाळीसगावचा आहे. या नामांकनाद्वारे त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे.

आघाडीचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा दुसराच सिनेमा आहे. 'वेडिंगचा शिनेमा' या त्यांच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या चित्रपटाने वाहव्वा मिळविली होती. यामुळे 'एकदा काय झालं…'कडूनही अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.

या चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले अशा नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराची यात मध्यवर्ती भूमिका आहे.

चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमील शृंगारपुरे व सौमेंदू कुबेर यांची आहे. शोबॉक्स एंटरटेन्मेट; अरुंधती दाते, अनुप निमकर, सलील कुलकर्णी तसेच नितीन प्रकाश वैद्य यांची 'गजवदना' प्रॉडक्शन्स' यांच्यातर्फे संयुक्तपणे ही निर्मिती होत आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news