पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या हॉटनेससाठी प्रसिध्द असलेली ईशा गुप्ताने नुकताच एक बोल्ड वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती जिम ड्रेसमध्ये वर्कआऊट करताना दिसते. पण, याच व्हिडिओमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीय. वास्तविक, ईशाने तिच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत महादेवाचे गाणे लावले होते, ज्यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता ट्रोल झाल्याबद्दल ईशाने तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे.
ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना ईशा गुप्ताने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ईशाची ही सिझलिंग स्टाईल पुन्हा एकदा लोकांना तिच्याकडे खेचत आहे.
ईशा गुप्ताने या पांढऱ्या कॉस्च्युम ड्रेसला एक गोंडस कॅप्शनही शेअर केले आहे. अभिनेत्रीचे हे कॅप्शन तिच्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे आहे. तिने लिहिले आहे-नजर को बदलो तो नजारे बदल जाते है.
याशिवाय ईशा गुप्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली ईशा इन्स्टाग्रामवर अनेकदा तिच्या जिमचे फोटो शेअर करत असते. जे पाहून लोकही त्यांच्याकडून खूप प्रेरित झाले आहेत.
इतकंच नाही तर ईशाला तिच्या मर्यादेपलीकडे बोल्डनेस दाखवल्याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. तर दुसरीकडे त्याचे जबरदस्त फॅन फॉलोईंगही तिच्या स्टाईलचे वेड आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या जिममधील फिटनेसचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील.
एक दिवस आधी ईशा सलवार सूटमध्ये विमानतळावर दिसली होती. लाईम ग्रीन कलरच्या या सूटमध्ये ईशा खूप सुंदर दिसत होती. ईशाच हा देसी लुक फॅन्सना खूप आवडला होती. एका युजरने लिहिलं की, 'ही किती सुंदर आहे." दुसऱ्या युजरने लिहिलं- 'खूप सुंदर'.
हेदेखील वाचा-