Naagin : एकता कपूरच्या मालिकांतून नागिन बनून रातोरात स्टार झाल्या 'या' अभिनेत्री | पुढारी

Naagin : एकता कपूरच्या मालिकांतून नागिन बनून रातोरात स्टार झाल्या 'या' अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही क्वीन एकता कपूर नागिन सीरीज आणताना प्रत्येकवेळी काही तरी नवी कथा घेऊन येते. त्यासोबचं प्रत्येक सीरीजमधील सुंदर सुंदर अभिनेत्री नागिणीच्या रुपात दिसतात. एकता कपूर नागिणचे (Naagin) एकापेक्षा एक भाग आणले आहेत. सर्वच सीझनमध्ये एकापेक्षा एक अभिनेत्री नागिणच्या रुपात आल्या आहेत. या अभिनेत्री रातोरात नागिनची (Naagin ) भूमिका साकारून स्टार झाल्या आहेत. त्यापैकी मौनी रॉय, तेज्सवी प्रकाश अशी काही उत्तम उदाहरणे देता येतील.

तेजस्वी प्रकाश असो वा मौनी रॉय अथवा मेहक चहल या अभिनेत्रींनी नागिणच्या भूमिका साकारल्या आहेत. एकता कपूर या अभिनेत्रींवर पाण्यासारखा पैसा ओतते. एकता कपूरच्या या फ्रँचायझीमध्ये काम करणारे कलाकार रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहेत. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या या अभिनेत्रींच्या यादीत मेहक चहल, मौनी रॉय, सुरभी ज्योती, अनिता हसनंदानी, हिना खान, निया शर्मा आणि सुरभी चंदना, तेजस्वी प्रकाश यांच्या नावांचा समावेश आहे. या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

तेजस्वी प्रकाश

एकता कपूरच्या प्रसिद्ध फ्रेंचाइजी ‘नागिन’च्या सहाव्या सीझनमध्ये नागाची भूमिका साकारणारी तेजस्वी प्रकाशने बरीच प्रसिद्धी मिळवली. गेल्या १० वर्षांपासून ती केवळ छोट्या पडद्यावरच काम करत नाही, तर तिने अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत. याशिवाय ती ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ या वेब सीरिजमध्येही दिसली आहे. एवढेच नाही तर ती ‘बिग बॉस १४’ ची विजेती देखील आहे. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, ती ११ ते १५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

मेहक चहल

तेजस्वी प्रकाशसोबत अभिनेत्री मेहक चहलही प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका ‘नागिन ६’ मध्ये नागिनची भूमिका साकारत आहे. ‘नागिन ६’ ची दुसरी नागिन मेहक चहल देखील गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. रिपोर्टनुसार, ती १० ते १५ कोटींत्या संपत्तीची मालकीण आहे.

हिना खान

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री हिना खानही मागे नाही. ती टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना ‘नागिन ६’ मध्येही दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, या शोच्या एका एपिसोडसाठी तिने डीड लाख ते २ लाख रुपये घेतले होते. या जबरदस्त टीव्ही अभिनेत्रीची एकूण संपत्ती ५२ कोटी असल्याचे म्हटले जाते.

सुरभी चंदना

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून टीव्हीच्या दुनियेत एंट्री करणाऱ्या सुरभीने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. एवढेच नाही तर ती अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सुरभी चंदना ‘नागिन ५’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. सुरभीने ‘नागिन ५’साठी एक लाख २० हजार रुपये मानधन घेतले होते.

अनिता हसनंदानी

एकता कपूरच्या बेस्ट फ्रेंडपैकी एक असलेल्या अनिता हसनंदानीनेही नाग बनून टीव्हीवर तिची जादू चालवली. एकताच्या अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर अनिताची नागिनमध्ये नकारात्मक भूमिका करण्यासाठी निवड झाली. त्याला या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती. अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे चार मिलियन डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.

सुरभी ज्योती

सुरभी ज्योती अनेकदा तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. ‘नागिन ३’ मध्येही तिने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. शोच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी तिने ६० हजार रुपये घेतले होते. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या सुरभीची एकूण संपत्ती तीन मिलियन डॉलर्स आहे.

निया शर्मा

या यादीतील पुढचे नाव टीव्हीच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. या यादीत निया शर्माचाही समावेश आहे. निया शर्मा आत्तापर्यंत अनेक मोठ्या शोमध्ये दिसली आहे. निया शर्माने काही दिवसांपूर्वीच नवीन घर आणि आलिशान कार खरेदी केली आहे. निया शर्माने नागिण बनण्यासाठी ४० हजार रुपये मानधन घेतले होते.

मौनी रॉय

टीव्हीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉय या मालिकेतील पहिली नाग होती. या मालिकेतून तिला इतकी लोकप्रियता मिळाली की ती आजही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. मौनी रॉय एका वर्षात सुमारे १२ कोटी रुपये कमावते.

Back to top button