Veena Jagtap : आली ठुमकत नार, लचकत मान; वीणाचा मराठमोळा अंदाज | पुढारी

Veena Jagtap : आली ठुमकत नार, लचकत मान; वीणाचा मराठमोळा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठिपक्यांची रांगोळीमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या वीणा जगतापने नवं फोटोशूट केलं आहे. (Veena Jagtap) वीणाला मराठमोळ्या अंदाजात तुम्ही पाहतचं राहाल. तिने हे फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. पिंक कलरच्या नऊवारी साडीत तिने आपलं अप्रतिम सौंदर्य दर्शवलं आहे. काळ्या रंगाचे जरी वर्क ब्लाऊज, साजेसे दागिने आणि केसात पुले माळून तिने हे फोटोशूट केले आहे. (Veena Jagtap)

वीणाने या लूकमधील एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वाड्याचा भला मोठा दरवाजाउघडून बाहेर य़ेताना दिसते. Apratim 🔥🔥🔥🔥🔥, Chan disaylay Tumhi.. Ekdamm bhari…. Marathmoli striiii….., Beautiful 🥰❤️, ❤️❤️, Kiti goad di ❤️❤️❤️, ❤️❤️❤️ Stunning😍😍😍, Gorgeous veenie di😘😘❤️❤️❤️, Sawan me lag gayi aag 🔥ki dil mera hayeeee 🎶, Beautiful Veenie Di 😍😍 अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी या फोटोंना देत आहेत.

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणाने तिच्या अभिनयाला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ती बिग बॉस मराठी -२ शोमध्येही दिसली होती. बिग बॉसमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. वीणा जगतापने ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली.

Back to top button