

प्रदर्शनाच्या ३३ व्या दिवशीही ‘धुरंधर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाने जागतिक कमाईत १३०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. दमदार कथा, जबरदस्त अॅक्शन आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षक अजूनही थिएटरकडे ओढले जात आहेत.
Dhurandhar 2 box office collection
प्रदर्शित होऊन तब्बल ३३ दिवस उलटले असतानाही ‘धुरंधर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाही. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाने आता जागतिक पातळीवर १३०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार करत सर्वांनाच चकित केलं आहे. तर ८०० कोटी निव्वळ कमाई भारतातील आहे.
'धुरंधर' ग्लोबल कलेक्शन
या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १३०० कोटींहून अधिक कमाई केली. भारतात, या चित्रपटाने ८०० कोटींहून अधिक निव्वळ कमाई केली आहे. त्यामुळे, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट (हिंदी भाषेत प्रदर्शित झालेला) ठरला आहे.
मंगळवारी, ३३ व्या दिवशी, चित्रपटाने भारतात ५.७० कोटी निव्वळ कमाई केली.
भारतातील कमाई -
* आठवडा १: २१८.०० कोटी
* आठवडा २: २६१.५० कोटी
* आठवडा ३: १८९.३० कोटी
* आठवडा ४: ११५.७० कोटी
* आठवडा ५ (विकेंड): ३५.८० कोटी
* दिवस ३२ (सोमवार): ५.४० कोटी
* दिवस ३३ (मंगळवार): ५.७० कोटी
भारतातील एकूण निव्वळ कमाई: ८३१.४० कोटी
जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजचा आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट इतिहास घडवायला तयार आहे.
रणवीर सिंहचा रक्ताने माखलेला दमदार लूक
'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता निर्मात्यांनी सिनेरसिकांसाठी नवे अपडेट्स आणले आहेत. धुरंधर २ ची चर्चा सगळीकडे होत असताना निर्माते आज दुपारी 'धुरंधर २' चा टीझर रिलीज करणार आहेत. यापूर्वी, त्यांनी चित्रपटाचा एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये रणवीर सिंह रक्ताने माखलेल्या अवतारात दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' चे निर्माते दुपारी १२:१२ वाजता चित्रपटाचे टीझर रिलीज झाला आहे. त्यापूर्वी, त्यांनी रणवीर सिंहचा एक दमदार लूक रिलीज करण्यात आला. यामध्ये, रणवीर लाल प्रकाशात पावसात उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर गभीर भाव दिसत आहेत. हे पोस्टर खुद्द रणवीर सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.
रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले, "आता बिघडण्याची वेळ आली आहे. धुरंधर: द रिव्हेंज. टीझर आज दुपारी १२:१२ वाजता. १९ मार्च २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे." त्याची ही पोस्ट पडताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.