

प्रियदर्शिनी इंदळकर हिने तिच्या ब्रेकअपबाबत स्पष्टपणे बोलताना सांगितलं की, तिचा पार्टनर तिच्यापेक्षा वयाने मोठा होता आणि हळूहळू ते नातं टॉक्सिक होत गेलं. हा निर्णय सोपा नव्हता, पण आवश्यक असल्याचं तिने सांगितलं.
Priyadarshini Indalkar On Breakup
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. एका शोमध्ये तिने तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
प्रियदर्शिनीचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रियदर्शिनीनं २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दशावतार' या सिनेमामध्ये भूमिका साकारलेली. या भूमिकेसाठी प्रियदर्शिनीचं कौतुक झालं. अशातच आता प्रियदर्शिनी पुन्हा 'लग्नाचा शॉट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेत्री अनेक माध्यमांना मुलाखत देतेय. अशाच एका कार्यक्रमादरम्यान प्रियदर्शिनीनं तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे.
आपल्या ब्रेकअपबद्दल प्रियदर्शिनी काय म्हणाली?
प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजित आमकर यांनी प्रणित मोरेच्या स्टॅन्डअप कॉमेडी शोला हजेरी लावलेली. यावेळी प्रणित मोरेने प्रियदर्शिनीला विचारलं की, 'तू सिंगल आहेस का?' यावर ती 'हो' म्हणाली. पुढे, प्रणितने विचारलं की, शेवटचं रिलेशनश आणि ब्रेकअपबद्दल कधी झालं? त्यावर प्रियदर्शिनीनं सांगितलं की, एप्रिल २०२५ मध्ये ब्रेकअप झाला. पुढे तिने आपल्या ब्रेकअप बद्दल सांगितलं की, 'जुळलं नाही. आमच्यात कॉम्पॅटिबिलिटी नव्हती.'
प्रणितने तिला पुढचा प्रश्न विचारला. रिलेशनशिप टॉक्सिक होतं का?. त्यावर प्रियदर्शिनी म्हणाली, 'नाही… तो किंवा मी टॉक्सिक नव्हतो. पण आमचं रिलेशनशिपच टॉक्सिक झालं होतं.' प्रणितने पुढे आणखी एक प्रश्न विचारला...ब्रेकअपचा निर्णय कोणाचा होता? यावर प्रियदर्शिनी म्हणाली, 'त्याला लवकर लग्न करायचं होतं. कारण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि मला घाई नव्हती. पुढे आमच्यात वाद सुरू झाले. अखेर वेगळे झालो.'
प्रियदर्शिनीचे आगामी चित्रपट
अभि आणि कृतिका बनून अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटातून भेटीला येत आहेत. या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
अक्षय गोरे चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करत आहेत. गीत-संगीत प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचे आहे. अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील कलाकार
प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकर सोबत प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.