Mardaani 3 Villain | मुलींची क्रूरपणे तस्करी करणाऱ्या खलनायिकेची हवा, 'मर्दानी'तील 'अम्मा' मल्लिका प्रसादविषयी जाणून घ्या

Mardaani 3 Villain | मुलींची क्रूरपणे तस्करी करणाऱ्या खलनायिकेची हवा, 'मर्दानी'तील 'अम्मा' मल्लिका प्रसादविषयी जाणून घ्या
Mallika Prasad and Rani Mukerji
who is Mardaani 3 Villain Mallika Prasad pudhari photo
Published on
Updated on
Summary

‘मर्दानी ३’ चित्रपटात ‘अम्मा’ नावाची खलनायिका मल्लिका प्रसादने साकारलीय. जाणून घ्या तिच्याबद्दल..

Mallika Prasad is playing villain role in Rani Mukerji’s Mardaani 3

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जी स्टारर "मर्दानी ३" चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रेक्षक चित्रपटाची कथा आणि त्यातील कलाकारांचे कौतुक करत आहेत. दरम्यान, चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मल्लिका प्रसाद हिच्या अभिनयाचे चित्रपट समीक्षकांकडून कौतुक होत आहे. "मर्दानी ३" मधील "अम्मा" हे खलनायकी पात्र अभिनेत्री मल्लिका प्रसादने साकारले आहे.

कोण आहे मल्लिका प्रसाद?

मल्लिका यांनी रंगभूमी आणि चित्रपटातही काम केलं आहे. मूळची बेंगळुरूची असलेल्या मल्लिकाने लंडनच्या गोल्डस्मिथ्स विद्यापीठातून परफॉर्मन्स मेकिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलीय. पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयात पदव्युत्तर डिप्लोमा केलाय.

चित्रपटाचा प्रवास १९९९ पासून सुरु झाला. चित्रपट कनूरू हेग्गाडिथि रिलीज झाला होता. पुढे २००१ मध्ये गुप्तगामिनीमध्ये मुख्य भूमिका साकारली. कन्नड चित्रपटसृष्टीतही त्यांनी नशीब आजमावले. मुसंजय कथा प्रसंग, गर्व, माघ मयूरीमध्ये अभिनय साकारला.

वेब सीरीज आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने अभिनय साकारला. मल्ल्काला सीरीज 'द किलर सूप', अनुराग कश्यपच्या डीजे मोहब्बत सोबत रिलीज झालेला चित्रपट 'ऑलमोस्ट प्यार'मधून ओळख मिळाली.

मल्लिकाने आपल्या भूमिकेविषयी काय सांगितले?

मल्लिकाने एका बातचीतमध्ये सांगितले की, "खलनायक जन्मतः जन्माला येत नाहीत; समाज लोकांना आकार देतो आणि त्यांचे वर्तन ठरवतो. अम्माचे पात्रही असेच आहे. अम्माच्या बाबतीत, ती थेट हिंसा नाही, तर पद्धतशीर हिंसा आहे. ती संरचनात्मक हिंसा आहे."

Mallika Prasad and Rani Mukerji
Priyadarshini Indalkar Breakup : 'तो माझ्यापेक्षा वयाने मोठा..शेवटी रिलेशनशीप टॉक्सिक झालं..' प्रियदर्शिनीने घेतला मोठा निर्णय

अम्मा एका भ्रष्ट आणि क्रूर व्यवस्थेत काम करते. अम्माच्या कोणत्याही दृश्यात शारीरिक हिंसाचार दाखवण्यात आलेला नाही. मल्लिका म्हणाली, अम्मा स्वतः कधीही शारीरिक हिंसाचार करत नाहीत, परंतु ती खूप हिंसाचार घडवते.

Mallika Prasad and Rani Mukerji
Rohit Shetty Firing Case | पुण्यासह लॉरेन्स बिश्नोईचं कनेक्शन? अकोल्याच्या शुभम लोणकरचं नाव समोर, गोळीबाराची घेतली जबाबदारी

मर्दानी ३ कलेक्शन

यश राज फिल्म्स ची हिट फ्रँचायझी मर्दानी 3, ज्यात राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत आहे. तीन दिवसांत चित्रपटाने भारतात १७.२५ कोटी रुपयांची कमाई केली असून, वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन २८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारत २१ कोटी ग्रॉस आणि ओव्हरसीज ७ कोटी ग्रॉस कलेक्शन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news