Dhurandhar 2 Salman Khan: धुरंधर २ मध्ये सलमान खानची एन्ट्री... सेटवरील फोटो खरंच लीक झाले?

Dhurandhar 2 Teaser Salman Khan: सलमान खान बडे सहाबची भूमिका साकारणार? व्हायरल फोटोमागील सत्य काय?
Dhurandhar 2 Salman Khan
Dhurandhar 2 Salman Khanpudhari photo
Published on
Updated on

Dhurandhar 2 Salman Khan: धुरंधरच्या पहिल्या भागाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता चाहत्यांना धुरंधरचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. आज (दि. ३ फेब्रुवारी) धुरंधर २ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळं धुरंधरची गरमागरम चर्चा सुरू आहे. पहिल्या भागात एका व्यक्तीरेखेचा सतत उल्लेख होत होता. ही व्यक्तीरेखा म्हणजे बडे सहाब! आता टीझर प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यात बडे सहाबची भूमिका ही सलमान खान साकारणार आहे असा दावा करण्यात आला आहे.

Dhurandhar 2 Salman Khan
Actress Soumya Tandon | ‘धुरंधर’नंतर सौम्या रोमँटिक चित्रपटात

धुरंधरच्या सेटवर सलमान खान?

इन्स्टाग्रामवर एक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यात धुरंधर २ च्या सेटवरचा लीक फोटो शेअर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोत धुरंधरच्या पहिल्या भागातील संजय दत्त आणि अर्जुन रामपाल हे सुपरस्टार दिसत आहे. त्यांच्या सोबत सलमान खान देखील असल्याचं दिसत आहे.

Dhurandhar 2 Salman Khan
Dhurandhar 2 Teaser: 'ये नया हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी, मारेगा भी...'; 'धुरंधर २'चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

एका युजरने कॅप्शनमध्ये दावा केला आहे की, 'मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू असलेल्या शूटिंगवेळी लांबून घेण्यात आलेल्या या फोटोमध्ये सलमान खान एक महत्वपूर्ण बाल्कनी सिक्वेंन्स शूट करताना दिसत आहे. त्याच्या सोबत मेजर इकबालच्या भूमिकेत असलेला अर्जुन रामपाल आणि एसपी असलमच्या भूमिकेत असलेला संजय दत्त दिसत आहे.'

यानंतर अनेक युजर्सनी सलमान खान हा बडे सहाबच्या भूमिकेत आहे अशी कमेंट करणं सुरू केलं. त्यामुळं ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. मात्र खरंच सलमान खान धुरंधर २ मध्ये आहे का?

फोटोमध्ये AI चा अँगल

ज्या युजरने हा फोटो शेअर केला आहे तो युजर AI चा वापर करून फोटो तयार करतो. या युजरने दावा केलेला धुरधंर २ च्या सेटवरील फोटोमध्ये देखील AI चा वापर केला गेला आहे. सोशल मीडियावर धुरंधर २ च्या शूटिंगवेळी काढलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचं शूटिंग मुंबईत सुरू असून ल्यारीचे लोकेशन तिथंच तयार करण्यात आलं आहे. त्यावेळी संजय दत्त आणि अर्जुन रामपाल हे एक महत्वाचा सिक्वेन्स शूट करत होते. हा जो जुना फोटो आहे त्यात सलमान खान कुठेही दिसत नाहीये.

मात्र सलमान खान असलेला जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे तो फोटो आणि हा जुना फोटो सारखाच आहे. नव्या फोटोत फक्त सलमान खानला AI द्वारे फीट केलं गेलं आहे.

Dhurandhar 2 Salman Khan
Dhurandhar BO Collection | ३३ व्या दिवशीही बल्लेबल्ले! 'धुरंधर' ८०० कोटी, ग्लोबल कमाई १३०० कोटी पार

टीझर रिलीज

सोमवारी धुरंधरच्या निर्मात्यांनी आज (दि.३ फेब्रुवारी) दुपारी १२.१२ मिनिटांनी धुरंधर २ चा टीझर रिलीज केला जाईल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे हा टीझर रिलीज केला असून 'ये नया हिंदूस्तान हैं या घर में घुसेगा भी और मारे गा भी' दमदार डायलॉग आहे. १९ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. पहिल्या भागात अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या भूमिकेनं चाहत्यांना वेडं केलं होतं. आता दुसऱ्या भागात काय होतं याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news