Dhurandhar 2 Pre-released earn | छप्पर फाड के! 'धुरंधर २' रिलीज होण्यापूर्वीच इतक्या कोटींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'जवान', 'ॲनिमल'ला पछाडले

Dhurandhar 2 Pre-released earn | छप्पर फाड के! 'धुरंधर २' रिलीज होण्यापूर्वीच इतक्या कोटींचा गल्ला, ४ तासांचा चित्रपट असूनही ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोडले 'जवान', 'ॲनिमल'चे रेकॉर्ड
ranveer singh
dhurandhar 2 pre release earn updates pudhari photo
Published on
Updated on
Summary

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. जगभरात या चित्रपटाने इतक्या कोटी रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग पूर्ण केले आहे. ३ तास ५५ मिनिटांचा प्रदीर्घ रनटाईम असूनही, प्रेक्षकांनी या स्पाय थ्रिलरला पसंती दिली आहे.

रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) ने खरोखरच बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली आहे. १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने जागतिक स्तरावर २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करूनॲडव्हान्स कमाईत जवान आणि ॲनिमल या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

ranveer singh
Bigg Boss Marathi -6 |''मी माझे वोट फुकट घालवणार नाही'', कॅप्टन संकेतच्या निर्णयाने गेममध्ये नवा ट्विस्ट

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे येतात जे रिलीज होण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनतात. रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) हे उत्तम उदाहरण सांगता येईल. १९ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे रिलीज होणाऱ्या या चित्रपटाने आज १८ मार्च रोजी होणाऱ्या 'पेड प्रिव्ह्यू' आणि जागतिक ॲडव्हान्स बुकिंगच्या जोरावर तब्बल २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' गुरुवारी, १९ मार्च रोजी रिलीज होणा आहे. धुरंधर २ चे ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरु असताना एकही शो रिलीज न होताच बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई आधीच केली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटात रणवीर सिंगचा 'जसकीरत सिंग रंगी' हा अवतार पुन्हा भेटीला येत आहे.

ranveer singh
Shraddha Kapoor wedding buzz | श्रद्धा कपूर राहुल मोदीशी लग्न करण्याच्या तयारीत? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे काय म्हणाली?

आदित्य धर दिग्दर्शित हा 'स्पाय थ्रिलर' 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने जगभरात १३०० कोटी रुपयांची कमाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, आता सिक्वेल देखील बहुप्रतीक्षित असून प्रीमियरसाठी जवळपास १० लाख तिकिटे विकली आहेत आणि ४२.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तब्बल १३० कोटींची कमाई केवळ पहिल्याच दिवशी पेड प्रिव्ह्यूजसह झाली आहे.

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने २०२३ मध्ये, ओपनिंग डेला जगभरात १२९ कोटींची कमाई केली होती. 'धुरंधर २' ने केवळ 'अ‍ॅडव्हान्स बुकिंग'च्या जोरावरच या चित्रपटांना मागे टाकले आहे.

रणवीर सिंह शिवाय या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी असतील. . चित्रपटाचा रनटाईम ३ तास ५५ मिनिटे इतका मोठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news