Shraddha Kapoor wedding buzz | श्रद्धा कपूर राहुल मोदीशी लग्न करण्याच्या तयारीत? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे काय म्हणाली?

Shraddha Kapoor wedding buzz | श्रद्धा कपूर राहुल मोदीशी लग्न करण्याच्या तयारीत? मावशी तेजस्विनी कोल्हापुरे काय म्हणाली?
Shraddha Kapoor
Shraddha Kapoor wedding buzzinstagram
Published on
Updated on
Summary

गेल्या अनेक महिन्यांपासून श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे त्यांच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Shraddha Kapoor wedding buzz

एका मुलाखतीत, श्रद्धा कपूर लवकरच राहुल मोदीशी लग्न करणार का, यावर श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचे तथाकथित डेटिंग सुरु असल्याच्या चर्चा सुरू होत्याच. या चर्चा बऱ्याच काळापासून ऐकिवात आहेत. त्यातच त्यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. या सर्व चर्चां दरम्यान, श्रद्धाची मावशी आणि अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडची 'आशिकी' गर्ल अर्थात श्रद्धा कपूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून श्रद्धाचे नाव प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते राहुल मोदी यांच्याशी जोडले जात आहे. सोशल मीडियावरील त्यांचे एकत्र फोटो आणि अनेक इव्हेंट्समधील त्यांची उपस्थिती यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी आता वेग घेतला आहे. नुकतेच श्रद्धाची मावशी आणि अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, श्रद्धा कपूर उदयपूरमध्ये राहुल मोदीसोबत हेरिटेज-स्टाईल लग्न करण्याचे प्लॅनिंग करत असल्याचे वृत्त समोर आले होते. एका मुलाखतीदरम्यान, तेजस्विनी यांना श्रद्धाच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तेजस्विनी हसल्या आणि म्हणाल्या, "खरोखर सांगायचे तर, मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला याविषयी काहीच कल्पना नाही."

Shraddha Kapoor
Bigg Boss Marathi -6 |''मी माझे वोट फुकट घालवणार नाही'', कॅप्टन संकेतच्या निर्णयाने गेममध्ये नवा ट्विस्ट

तेजस्विनी म्हणाल्या, "अर्थातच, ही एक अतिशय सुखद भावना आहे. मला वाटते की प्रत्येकानेच यात आपापले योगदान दिले आहे. पद्मिनी कोल्हापुरे ही यातील पहिली व्यक्ती होती. पद्मिनीला ज्या प्रकारची लोकप्रियता लाभली होती, तो काळच वेगळा होता; त्याची तुलना तुम्ही आजच्या काळाशी करू शकत नाही. अर्थातच, श्रद्धाने हा वारसा आणखी पुढे नेला आहे. आमच्या कुटुंबाचे नाव ज्या प्रकारे पुढे नेले जात आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो."

राहुल मोदी आणि श्रद्धा कपूरचे रिलेशनशीप

श्रद्धा आणि राहुल मोदी पहिल्यांदा २०२४ च्या सुरुवातीला एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर अनेकदा त्यांना विमानतळावर किंवा खासगी पार्ट्यांमध्ये सोबत पाहण्यात आले. श्रद्धाने देखील सोशल मीडियावर राहुलसोबतचे काही फोटो शेअर केले होते. काही महिन्यांपूर्वी श्रद्धाने इन्स्टाग्रामवर "मी लग्न करेन" अशी एक कमेंट केली होती. त्यामुळे २०२६ मध्ये ती आता विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Shraddha Kapoor
Hardeek Joshi cinema The Trap| रांगड्या अंदाजानंतर आता 'द ट्रॅप'चा थरार; साध्या 'राणा दा'चा खतरनाक लूक पहा

श्रद्धाचे आगामी प्रोजेक्ट्स

श्रद्धाकडे स्त्री २, भेडिया २, ईठा असे चित्रपट आहेत. सध्यातरी कोल्हापुरे आणि कपूर कुटुंबाकडून लग्नाची कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news