Gold Silver Price Today: सोनं तब्बल ३,१६० रुपयांनी स्वस्त! चांदीही १० हजारांनी घसरली; खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी, आजचा भाव काय?

२८ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,८२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २८ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,८२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. गेल्या आठवडाभरात देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ३,१६० रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याचा दरही सुमारे २,९०० रुपयांनी कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. सध्या स्पॉट गोल्डचा दर ४,२८२.९८ डॉलर प्रति औंस आहे. गेल्या एका आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा भाव २.१ टक्क्यांनी घसरला आहे.

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. २८ सप्टेंबरला चांदीचा दर २,४४,९०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर सध्या ६४.२६ डॉलर प्रति औंस आहे.

Gold Silver Price Today
Man Urinates Train Coach: गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये लघुशंका केली; प्रवासी पाहतच राहिले, विरोध करताच झाला राडा, व्हिडिओ व्हायरल

पुणे आणि मुंबईत सोन्याचा आजचा भाव

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १५,०१७ रुपये प्रति ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३,७६५ रुपये प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ११,२६३ रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुण्यातही सोन्याच्या दरात घसरणीचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचे दर महत्त्वाचे ठरत आहेत. स्थानिक सराफ बाजारानुसार दरांमध्ये थोडा फरक असू शकतो.

Gold Silver Price Today
CJP Protest Mumbai: शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनाला ब्रेक; मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सांगितली ४ महत्त्वाची कारणं

सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती यांचा सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news