

Tanya Mishra National Crush: मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या तानिया मिश्राने सोशल मीडियावर चांगलीच बझ निर्माण केली आहे. चाहत्यांना तिची इतकी भुरळ पडली आहे की तिला ते भारताची नवी नॅशनल क्रश म्हणत आहेत. तिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंद ठरले आहेत. तिची फॅशन, तिचे मॉडेलिंग करिअर आणि अभियन क्षेत्रातील नवे प्रोजेक्ट आता तिचं सगळंच चर्चेत आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स हे १.२ मिलियनच्या आसपास आहेत. तानिया ही आता जास्तच फेमस झाली आहे. आता लोकं तिच्या दिसणं नाही तर तिचं काम देखील पाहत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. त्यामुळं ही तानिया मिश्रा आहे तरी कोण अशी उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे
तानिया मिश्रा (Tanyaa Mishra) ही मुंबईतील एका मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती मुळची बिहारची असून गया जिल्ह्यातून येते. तिचा जन्म ३१ जानेवारी १९९९ चाअसून तिने मगध विद्यापीठातून बी. कॉमची डिग्री घेतली आहे. त्यानंतर तिची पावले मॉडेलिंग आणि अभिनयाकडे वळली.
तिच्या व्यावसायिक पोर्टफोलियोबद्दल बोलायचं झालं तर ती फिमिना, फिल्मफेअर आणि ग्राझिया या सारख्या नामांकित मॅगझिनमध्ये झळकली असून ती एप्रिल - मे २०२५ च्या फेमिनाच्या कव्हर पेजवर देखील झळकली आहे. तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये देखील भाग घेतला असून मिस इंडिया २०१९ मध्ये तिने चौथा क्रमांक पटकावला होता. तिने २०२४ चा फेमिना अचिव्हर्स पुरस्कार देखील मिळवला आहे. तसेच २०२३ चा लोकमत पुरस्कार देखील मिळाला आहे. तिचा इटी नाऊ आणि मिड डेने देखील सन्मान केला आहे.
मॉडेलिंग सोडून तानियाने चित्रपट, वेब सिरीज आणि म्युजिक व्हिडिओत देखील काम केलं आहे. तिने गजवानी अँड चेस या चित्रपटात दिसली होती. तिने सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका निभावली होती. त्यानंतर ती चिडिया उड या वेब सिरीजमध्ये देखील दिसली आहे. यात जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका चावला यांनी देखील भूमिका साकारली होती.
तानिया मिश्राच्या नावावर ७ म्युजिक व्हिडिओ आहेत. त्यात तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. यात नखरो, आणि तू मेरा हो जाएगा या म्युजिक व्हिडिओंचा समावेश आहे. तिचे सध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळं लोकं आता तिच्या अभिनय आणि इतर व्यावसायिक यशाबाबत जाणून घेत आहेत.
लोकं तिला नॅशनल क्रश म्हणून डोक्यावर घेऊ लागल्यानं आता तिच्या पदरात चांगल्या अन् मोठ्या बॅनरचे चित्रपट देखील पडण्याची शक्यता आहे. अजून तरी तिच्या पुढच्या प्रोजेक्टची कोणतीही घोषणा झालेली नाही.