Beast (2022) : ‘बीस्ट’वर कुवैतमध्ये बंदी

Beast (2022) : ‘बीस्ट’वर कुवैतमध्ये बंदी

Published on

पुढारी ऑनलाईन : 
थलपती विजयच्या 'बीस्ट' या बहुप्रतीक्षित चित्रपटावर कुवैत देशात बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटात इस्लामिक दहशतवादाशी संबंधित काही दृश्ये दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे कुवैतने या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

या 'होस्टेज थीलर' चित्रपटात दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलिस ठेवले असल्याचे दाखविले आहे. ज्या चित्रपटांमध्ये अरब देशांत दहशतवाद्यांचे अड्डे दाखवले जातात, त्या सर्व चित्रपटांवर तिथे बंदी घालण्यात आली आहे. 'बीस्ट'आधीही कुवैत सरकारने दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानच्या 'कुरूप' आणि विष्णू विशालच्या 'एफआयआर' या चित्रपटांवर बंदी घातली होती.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news