riteish deshmukh : खाऊन खाऊन पोट सुटलं, तरीही अजून खा की खा! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क
एखाद्या अभिनेत्याला त्याच्या प्रत्येक नव्या भूमिकेसाठी अनेक बदलांना सामोरे जावे लागते. चित्रपटातील भूमिकेसाठी कधी वजन वाढवणं सोपं आहे हो पण ते कमी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. आमिर खान ते क्रिती सेनॉनपर्यंत अनेक स्टार्स आपण पाहिलेत. त्यांनी आपापल्या भूमिकेसाठी वजन वाढवण्यासाठी काय काय प्रयत्ने केले आहेत, हे सर्वांनाच माहितीये. या स्टार्सनी प्रवास शेअर केलाय. आजकाल रितेश देशमुख त्याच्या आगामी मिस्टर मम्मी चित्रपटासाठी वजन वाढवण्यासाठी त्याचा आवडता पदार्थ खात आहे. (riteish deshmukh) रितेशने पोटभर जेवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो खूप सारे पदार्थ खाताना दिसत आहे. (riteish deshmukh)
विशेष म्हणजे शर्टमधून त्याचं सुटलेलं पोट देखील दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, तो त्याच्या पुढील चित्रपटासाठी वजन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. या चित्रपटामध्ये त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देखील दिसणार आहे.
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये, रितेशने त्याच्या जेवणाचे “लो-कॅलरी जेवण” असे वर्णन केले. त्याचे श्रेय त्याने दिग्दर्शकाला दिले आहे. दिग्दर्शकाने त्याला गर्भवती दिसण्यासाठी वजन वाढवण्यास सांगितले आहे. या व्हिडिओतही शान चित्रपटातील एक डायलॉग देखील वापरला आहे. व्हिडिओमध्ये रितेश भात-करी आणि चपाती खाताना दिसत आहे. त्याच्या शर्टची काही बटणे उघडी आहेत आणि त्याचे पोट बाहेर आलेले दिसत आहे.”
फेब्रुवारीच्या सुरुवातीला, रितेश आणि जेनेलियाने घोषणा केली की ते मिस्टर मम्मीमध्ये एकत्र स्क्रीन शेअर करतील. हा चित्रपट एका जोडप्याच्या कथेभोवती फिरतो. ज्यांचे मुलांच्या बाबतीत एकसारखे मत नाही, परंतु नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळाच प्लॅन केला आहे. या चित्रपटात रितेश आई बनला आहे.
- रेखा ते राधिका आपटे ! या १२ अभिनेत्रींनी बोल्ड आणि न्यूड सीन्स देऊन चाहत्यांना फोडला घाम
- द काश्मीर फाईल्सचं टेक होम काय?
- संजय राऊतांवर कारवाईची गरजच काय होती ? शरद पवारांची थेट पीएम मोदींकडे विचारणा !
View this post on Instagram