

पुढारी ऑनलाईन :
शाहिद कपूरचे करिना कपूरशी दीर्घकाळ (चार वर्षे!) प्रेमप्रकरण सुरू होते. 'टशन'च्या वेळी अचानक करिना त्याच्यापासून वेगळी झाली आणि सैफ अली खानबरोबर दिसू लागली. त्यानंतर दोघांचे लग्नही झाले. इकडे प्रेमभंगाचे दुःख पचवून शाहिदनेही दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी 'अॅरेंज मॅरेज' करून संसार थाटला.
आता दोघांना मीशा आणि झेन ही दोन गोंडस अपत्ये आहेत. मीरा आणि शाहिदची जोडी बॉलिवूडमधील लाडक्या जोड्यांपैकी एक आहे.अशा स्थितीत शाहिदने आता एका मुलाखतीत म्हटले आहे की, लग्नानंतर वर्षभरातच मीरा त्याच्यापासून वेगळी होणार होती!
याबाबत त्याने सांगितले, मीराने 2015 मध्ये लग्नानंतरच्या वर्षभरातच 'उडता पंजाब' पाहिला. यामध्ये शाहिदने ड्रग्जचे व्यसन असलेल्या रॉकस्टारची भूमिका केली आहे. हा चित्रपट पाहत असताना अचानक ती उठून बाजूला गेली. तिला काय झाले हेच मला समजेना. तिने मला विचारले की, तू खर्या आयुष्यातही असाच आहेस का? मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मी तिला समजावले की, ती फक्त एक भूमिका आहे, खर्या आयुष्याचा त्याच्याशी काही संबंध नाही! त्यानंतर मीरा शांत झाली.