आर्यन हगवणे याचे खुर्ची सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण

आर्यन हगवणे
आर्यन हगवणे
Published on
Updated on

'आला आला आला आला खुर्चीचा राजा आला' अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले आहे. सत्तेसाठीच्या डावपेचांना मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. या मोशन पोस्टरच्या शेवटी एक लक्षवेधी चेहरा सत्तेच्या खुर्चीत राजासारखा बसलेला आहे. त्याच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे, हा चेहरा म्हणजे अभिनेता आर्यन हगवणे आहे. आर्यन हगवणे या चित्रपटात राजवीर राजाराम देसाई या नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आर्यन हा खुर्ची या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'ॲक्ट प्लॅनेट ॲक्टिंग' अकॅडमी आणि जवळच्या भरपूर व्यक्तींकडून आर्यनने अभिनयाचे धडे घेत त्याने अभिनयाची आवड जोपासली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून फॅशन मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करून त्यानंतर आर्यनने अभिनय क्षेत्रात बरीच पारितोषिक पटकवली.

चित्रपटाबद्दल बोलताना आर्यन म्हणाला, "खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपटआहे. मी पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले. विशेष म्हणजे आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'आराध्या मोशन फिल्म्स' प्रस्तुत संतोष वसंत हगवणे याची निर्मिती आहे. दिग्दर्शक अविनाश खोचरे-पाटील आणि 'ॲक्ट प्लॅनेट टिम' दिग्दर्शित 'खुर्ची' सिनेमाच्या टिझरनंतर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.या मोशन पोस्टर मध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासंदांचे प्रेम, प्रचार याचे हुबेबुब वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.

'आराध्या मोशन फिल्म्स' प्रस्तुत संतोष हगवणे निर्मित हा चित्रपट आहे. सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर आणि अमित बैरागी यांची सहनिर्मिती आहे.

राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांची आहे. क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रितम एस के पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली.

खुर्चीसाठी खेळली जाणारी लढाई खेळताना त्याचा इतरांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.  ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु 'खुर्ची' या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news