Red Notice : नेटफ्लिक्सवर पाहा 'धूम'पेक्षाही सुपर 'रेड नोटीस' | पुढारी

Red Notice : नेटफ्लिक्सवर पाहा 'धूम'पेक्षाही सुपर 'रेड नोटीस'

पुढारी ऑनलाईन :

ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson), रयान रेनल्ड (Ryan Reynolds) आणि गल गॅडोट (Gal Gadot) चा ॲक्शन कॉमेडी चित्रपट रेड नोटीस नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. रेड नोटीस हा  (Red Notice) Netflix आतापर्यंतचा सर्वात महाग चित्रपट आहे. याचे दिग्दर्शक आणि लेखक राॅसन मार्शल थर्बर यांनी केले आहे.

RED NOTICE – RYAN REYNOLDS, GAL GADOT and DWAYNE

‘रेड नोटीस’च्या कहाणीचा पहिला चोर आहे-नोलन बूथ. नोलन म्हणजेच विना मास्कचा डेडपूल-रेयान रेनॉल्ड्स. दुसरा चोर आहे-द बिशप. म्हणजेच गल गडोट.

समीक्षकांनी असे म्‍हटलं आहे की, जर धूम-४ रिलीज झाला असता तर नक्कीच ऐश्वर्याची एन्ट्री झाली असती. आणि तिने ‘क्रेजी किया रे’सारख्या गाण्यावर डान्स केला असतं. असचं काहीसं रेड नोटीसमध्ये आहे. काही समीक्षक तर म्हणत आहे की, धूम-४ ची स्क्रिप्ट ही रेड नोटीसची स्क्रिप्ट आहे. ती चोरली गेलीय. काही समीक्षकही असं म्हणताहेत की- थ्रिलवाल्या प्लॉटमध्ये ट्विस्ट्स आहेत. वीएफएक्स सीन पाहून ‘जानी दुश्मन’ या चित्रपटाची आठवण येऊ शकते.

gal gadot

‘रेड नोटीस’ चित्रपट २ तासांचा आहे. या चित्रपटासाठी ड्वेन, गल गडोट, रेनॉल्ड्स यांनी खूप मेहनत घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. तेव्हा या स्क्रिप्टचा लिलाव झाला होता. तमाम दिग्गज स्टुडिओ याचे हक्क खरेदी करण्यासाठी पुढे सरसावले होते. ड्वेन जॉनसनने चित्रपटासाठी २ कोटी डॉलर मानधन घेतले. तितकचं मानधन घेऊन अभिनेत्री गल गडोट जगातील सर्वात तिसरी महाग अभिनेत्री झाली आहे.

gal gadot

या चित्रपटाचे जवळपास २० कोटी डॉलर म्हणजेच १४९० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्‍यामुळे नेटफ्लिक्स ओरीजनलवरील हा आतापर्यंत सर्वात महाग चित्रपट आहे.

gal gadot

‘द रॉक’ ड्वेन जॉनसन, ‘फ्रीगाय’ रयान रेनॉल्ड्स आणि ‘वंडर वूमन’ गल गडोट हे पहिल्यांदा एकत्र चित्रपटात दिसताहेत. हे ‘रेड नोटीस’चं आकर्षण आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by @sporemaxis14

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

Back to top button