Interesting story of Amitabh Bachchan Jalsa bunglow|अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला 'जलसा' नाव कसं पडलं? हाच बंगला आता वादात

Interesting story of Amitabh Bachchan Jalsa bunglow | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला 'जलसा' नाव कसं पडलं? हाच बंगला आता वादात
Jalsa bunglow
Jalsa bunglow
Published on: 
Updated on: 

Amitabh Bachchan Jalasa bunglow story

बिग बी अमिताभ यांचा बंगला जलसा सर्वश्रृत तर आहेच. अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईत ‘प्रतीक्षा’ सारखे इतर बंगले देखील आहेत, परंतु ‘जलसा’ हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक श्रद्धास्थान बनला आहे. प्रत्येक रविवारी देशभरातून येणारे चाहते आधीपासूनच ‘जलसा’च्या गेटबाहेर जमतात. त्यामुळे चाहत्यांची ही सोय लक्षात घेऊन आणि जुनी परंपरा कायम ठेवण्यासाठी ते याच बंगल्याच्या बाल्कनीत किंवा कट्ट्यावर येऊन चाहत्यांना संडे दर्शन देतात. सध्या हाच जलसा बंगला चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुंबई येथील बंगला 'जलसा' सध्या चर्चेत आहे. यामागील कारण आहे- बच्चन कुटुंबातील अंतर्गत कलह. संपत्तीच्या वादावरूनच सध्या हा बंगला चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांची वहिनी रमोला बच्चन यांनी या बंगल्यावरून कायदेशीर प्रक्रिया सुरु केलीय.

चित्रपट वा खासगी आयुष्य नव्हे तर हा संपत्तीचा वाद आहे. अमिताभ बच्चन यांची वहिनी रमोला बच्चन १९९३ मध्ये तयार करण्यात आलेल्या एका गिफ्ट डीडला आव्हान दिले आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून जलसा बंगल्याचा मालकी हक्क जया बच्चन यांच्या नावे करण्यात आला होता. पण रमोला बच्चन यांनी दावा केला की, ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या परवानगी विना घेण्यात आली.

कसा आहे अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला?

मुंबईच्या जुहू परिसरातील जलसा अमिताभ बच्चन यांच्या सर्वात किमती घरांपैकी एक आहे. त्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये सांगितली जाते. हा दोन मजली बंगला असून तो १०,१२५ वर्ग फूटमध्ये आहे. . यामध्ये आकर्षक बैठक व्यवस्था, बाग, वैयक्तिक जिम, रेकॉर्डिंग, होम थिएटर सुविधा आहेत.

या बंगल्यात अमिताभ बच्चन यांच्या आठवणी आणि इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. शिवाय, अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेशी निगडित तपशीलही बंगल्यात पाहायला मिळतात. दर रविवारी बंगल्याबाहेर जमणाऱ्या चाहत्यांना अभिवादन करण्याची अमिताभ बच्चन यांची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

जलसा नावामागील खास कहाणी

अमिताभ बच्चन यांच्या या बंगल्याचे नाव ‘मानसा’ होतं. १९८२ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेला चित्रपट सत्ते पे सत्ताला अफाट यश मिळाल्यानंतर निर्माता एनसी सिप्पी (NC Sippy) यांनी अमिताभ बच्चन यांना फी म्हणून तो दिला होता. पण नंतर काही कारणांनी अमिताभ यांनी तो बंगला विकला.

पण, काही काळानंतर जया बच्चन यांच्या हट्टानंतर अमिताभ बच्चन यांनी हा बंगला अधिक पैसे देऊन पुन्हा खरेदी केला. आणि त्यावेळी या बंगल्याचे जुने नाव बदलून ‘जलसा’ असे ठेवण्यात आले.

Jalsa bunglow
Sharad Kapoor| माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्न, छेडछाडीचा आरोप; 'जोश'मध्ये शाहरुखला टक्कर दिलेल्या अभिनेत्याचं करिअर कसं बाद झालं?

जलसा नावाचा अर्थ काय?

हिंदीमध्ये 'जलसा' या नावाचा अर्थ उत्सव (सेलिब्रेशन) असा होतो.

Jalsa bunglow
Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil | अवघे काहीच दिवस शिल्लक! 'पत्री सरकार १९४२' लवकरच येतोय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.