Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil | अवघे काहीच दिवस शिल्लक! 'पत्री सरकार १९४२' लवकरच येतोय

Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil | अवघे काहीच दिवस शिल्लक! 'पत्री सरकार १९४२' लवकरच येतोय
Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil
movie Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil coming soon
Published on: 
Updated on: 

१९४२ च्या 'छोडो भारत' (Quit India) आंदोलनादरम्यान साताऱ्यात ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला बंड, समांतर लोकसरकारची स्थापना आणि क्रांतिकारकांचा लढा पत्री सरकार १९४२ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन मनीष अनसुरकर यांनी केले आहे. तर निर्मिती 'भागीरथी मोशन पिक्चर्स'च्या बॅनरखाली विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे.

Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil
Sidhu Moosewala Phantom Song Controversy | 'फँटम' गाण्यामुळे वाद, पालकांनी सागा म्युझिकवर लावले गंभीर आरोप

चित्रपटात अभिनेता अनिल राबाडे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय अनुराधा धामणे, सिद्धार्थ बाडी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेता अंकित मोहनची यामध्ये विशेष भूमिका आहे.

Patrisarkar 1942 Krantisinh Nana Patil
Rinku Rajguru movie Jijai trailer| घनदाट जंगल, गूढ भास, निर्मनुष्य रस्ता...रिंकूचे अंगावर काटा आणणारे जबरदस्त ॲक्शन सीन्स

चित्रपटाचे पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांचे असून, विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांनी गाणी गायली आहेत.

हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट आगामी २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा कथा विस्तार अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या धारदार आवाजातून उलगडत जातो.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजी हुकूमत विरोधात समांतर प्रतिसरकार उभारणारे थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक पर्वावर आधारित हा चित्रपट आहे. भागीरथ मोशन पिक्चर्स बॅनरखाली तयार झालेला पत्री सरकार १९४२ येत्या २० नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.