Sharad Kapoor| माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्न, छेडछाडीचा आरोप; 'जोश'मध्ये शाहरुखला टक्कर दिलेल्या अभिनेत्याचं करिअर कसं बाद झालं?

Josh Fame Sharad Kapoor career decline controversy | बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्न..दुरावा..छेडछाडीचा आरोप; 'जोश'मध्ये शाहरुखला टक्कर दिलेल्या या अभिनेत्याचे करिअर कसं बाद झालं?
शाहरुऱ खान-शरद कपूर
जोशमध्ये अभिमेता शरद कपूरने शाहरुखसोबत महत्वाची भूमिका पार पाडली होती Pudhari photo
Published on: 
Updated on: 

बॉलिवूडने अनेक कलाकारांना जशी यशाची वाट दाखवलीय, दुसरीकडे अनेक कलाकारांचे अख्खं करिअर अक्षरश: बाद झालं आहे. सध्या चर्चेत असणाऱ्या एका अभिनेत्याबाबत असेच काहीसं घडलं आहे. तो अभिनेता आहे - शरद कपूर. ज्याने बॉलिवूडपट जोशमध्ये काम केलं होतं. शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या जोशमध्ये शरद कपूरची शाहरुख खान विरोधात भूमिका होती. तो त्यावेळी इतका चर्चेत आला होता की, जोशमध्ये शाहरुख खानला टक्कर देणारा अभिनेता म्हणून त्याची ख्याती झाली होती.

एकेकाळी करिअर घडत असताना असं अचानक काय घ़डलं की, त्याची आता अशी दयनीय अवस्था झालीय. सोशल मीडियावर अचानक एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एक व्यक्ती उलटा टी शर्ट, मळलेली जीन्स पँट, पिकलेले केस, वाढलेली दाढी अन्‌ वॉकर घेऊन चालताना दिसला. तो हाच अभनेता शरद कपूर आहे, ज्याने शाहरुखसोबत जोशमध्ये काम केलं होतं. बघता बघता हा व्हिडिओ अनेक माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्याला मदत करण्यासाठी सोनू सूद, सलमान खान सारखे अभिनेते पुढे आले आहेत. पण, एखाद्या कलाकाराची अशी अवस्था कशी झाली?

कोण आहे शरद कपूर?

शरद कपूरचा जन्म पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे झाला. तो एका पंजाबी परिवारातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरदचे आई-वडील पेशावरमध्ये राहणारे एक आर्किटेक्ट म्हणून काम करत होते.

चित्रपट करिअर

अभिनेता शरद कपूरला 'दस्तक' हा थ्रिलर चित्रपट मिळाला. १९९६ पासून सुरु झाला त्याच्या अभिनयाचा प्रवास. या चित्रपटात सुश्मिता सेनने काम केले होते. मग २००० मध्ये त्याला शाहरुख-ऐश्वर्याचा जोश चित्रपट मिळाला. गोव्यात एका टोळीचा लिडर म्हणून त्याची भूमिका होती, ज्याचे अनेक लोकांशी शत्रुत्व असते. यात शाहरुख आणि शरद कपूर यांच्यात कट्टर शत्रुत्व दाखवण्यात आले आहे. पुढे त्याने जे. पी. दत्ता यांच्या 'एलओसी: कारगिल'मध्ये मेजर विजय भास्करची भूमिका केली होती. २००३ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

तसेच फरहान अख्तरचा चित्रपट 'लक्ष्य'मध्येही काम केलं होतं. भूमिका होती मेजर बिनोद सेनगुप्ता. हा चित्रपट २००४ मध्ये झाला होता. सलमान खानच्या ‘ये है जलवा’ चित्रपटातही तो दिसला होता. याशिवाय त्याने त्रिशक्ति, तमन्ना, इसकी टोपी उसके सर या चित्रपटातही काम केलं होतं.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्न अन्‌ दुरावा

शरद कपूरने पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसुशी 2008 मध्ये लग्न केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना मूल देखील आहे. रिपोर्टनुसार, त्यांचे नाते फार काळ टिकलं नाही.

2024 मध्ये लागले गंभीर आरोप

अभिनेता शरद कपूरवर 2024मध्ये अचानकपणे गंभीर आरोप लागले. मीडिया रिपोर्टनुसार, खार पोलिसमध्ये एका महिलेने त्याच्यावर गंभीर आरोप केले. काम करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून छेडछाड केल्याचा आरोप त्याने केला. त्यावेळीही तो चर्चेत आला होता.

दरम्यान, एका अपघातात त्याच्या पायाचे हाड तुटल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्याला चालताना समस्या जाणवू लागली. बॉलिवूड काम करणं अशक्य झाला. आता अशी वेळ आली की, तो वॉकर घेऊन चालू लागला.

सोनू सूद, सलमानचा मदतीचा हात

चित्रपट इंडस्ट्रीतील सिनिअर कलाकारांकडे शरदने काम मिळण्यासाठी आणि मदतीची याचना केली होती. आता सलमानने त्याला मदत करण्याचे सांगितले तर अभिनेता सोनू सूदने त्याच्या उपचारांसाठी डॉक्टरांची टीम पाठवलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.