Amitabh Bachchan: 'रिटायर होण्याची वेळ आली…', बिग बींच्या पोस्टने चर्चांना उधाण; अखेर अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा

Amitabh Bachchan Retirement: अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगमधील “रिटायर होण्याची वेळ आली” या वक्तव्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते.
Amitabh Bachchan Retirement
Amitabh Bachchan RetirementPudhari
Published on
Updated on

Amitabh Bachchan Retirement: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या सहा दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. वयाची ८३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या कामातील उत्साह कायम आहे. मात्र, नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमुळे अमिताभ बच्चन अभिनयातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द अमिताभ बच्चन यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देत आपण अभिनय किंवा कामातून निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘रिटायर होण्याची वेळ आली’ या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये “देर हो गई है... अब रिटायर होने का समय है” अशा आशयाचे विधान केले होते. हे वाक्य सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. त्यामुळे अमिताभ बच्चन आता अभिनयातून निवृत्ती जाहीर करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र, या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेल्याचे अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या ब्लॉगवर निवृत्तीशी संबंधित बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत स्पष्टीकरण दिले.

“मी कामातून रिटायर होत नाहीये”

अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले की, त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेल्या वाक्याचा अर्थ काम सोडण्याचा नव्हता. ते म्हणाले की, “देर हो गई है, रिटायर होने का समय हो गया है” याचा संदर्भ रात्री उशिरा झोपण्याशी होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार, “रिटायर” म्हणजे कामातून कायमची निवृत्ती नव्हे, तर त्या क्षणी काम आटोपून झोपायला जाणे, असा त्यांचा संदर्भ होता. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत सुरू झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Amitabh Bachchan Retirement
Sooraj Pancholi Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात सूरज पंचोलीचा मोठा खुलासा; आदित्य ठाकरेंच नाव घेत म्हणाला, 'माझ्याकडे...'

वयाच्या ८३व्या वर्षीही कामाचा उत्साह कायम

अमिताभ बच्चन यांची कामाप्रती असलेली ऊर्जा आजही कायम आहे. चित्रपटांचे शूटिंग असो, टेलिव्हिजनवरील कार्यक्रम असो किंवा सोशल मीडिया... ते सातत्याने सक्रिय असतात.

अमिताभ बच्चन एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर चाहत्यांशी संवाद साधतात. याशिवाय ते नियमितपणे ब्लॉग लिहून आपल्या विचारांनाही वाट करून देतात. मात्र, त्यांच्या ब्लॉगमधील काही वाक्यांचा अनेकदा वेगळा अर्थ घेतला जातो. यावेळीही त्याच कारणामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या.

Amitabh Bachchan Retirement
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; चांदी तब्बल ३ हजारांनी महागली, तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

‘कल्कि 2898 एडी’च्या सीक्वेलमध्ये दिसणार बिग बी

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्कि 2898 एडी’च्या सीक्वेलमध्ये ते पुन्हा एकदा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती.

याशिवाय अमिताभ बच्चन सध्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे बिग बींच्या स्पष्टीकरणानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की महानायकाचा अभिनयाचा प्रवास अद्याप थांबलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news