

Gold Silver Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. आज MCX वर सोन्याच्या दरात ९७६ रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा भाव १,५१,७८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात तब्बल ३,०८२ रुपयांची वाढ झाली असून, चांदी २,३५,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत ०.८८ टक्क्यांची वाढ झाली असून, सोन्याचा भाव सुमारे ४,३७० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदीच्या किमतीत १.९६ टक्क्यांची वाढ झाली असून, चांदी सुमारे ६५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
त्यामुळे आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१६ सप्टेंबर रोजी सराफा बाजारातील दरांनुसार, नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे १,५१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,१४१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,५२,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,३७९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,५२,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,३७९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
शहरानुसार सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. स्थानिक कर, मेकिंग चार्ज आणि इतर शुल्कांमुळे प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी ग्राहकांना वेगळा दर लागू होऊ शकतो.
सोन्यासोबत चांदीच्या दरातही आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. उपलब्ध बाजारातील आकडेवारीनुसार, नवी दिल्लीत ९९९ फाइन सिल्व्हरचा भाव सुमारे २,३४,०७० रुपये प्रति किलो आहे.
मुंबईत चांदीचा दर २,३४,४८० रुपये प्रति किलो, तर बंगळुरूमध्ये सुमारे २,३४,६६० रुपये प्रति किलो आहे. हैदराबादमध्ये चांदीचा भाव २,३४,८५० रुपये प्रति किलो, तर चेन्नईमध्ये तो सुमारे २,३५,१६० रुपये प्रति किलो आहे.
मात्र, MCX वरील व्यवहारात चांदीच्या दरात आज तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाल्याने सराफा बाजारातील दरांमध्येही पुढील व्यवहारात बदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जागतिक पातळीवरील आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
दुसरीकडे, औद्योगिक मागणी, गुंतवणूकदारांचा कल आणि चलन बाजारातील चढ-उतार यामुळे चांदीच्या दरावरही परिणाम होत आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळेही मौल्यवान धातूंच्या बाजारात हालचाली वाढल्या आहेत.
सप्टेंबरमध्ये चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण दिसून आली असली, तरी एकूणच चांदीचे भाव मागील पातळीच्या तुलनेत अजूनही जास्त आहेत.
आज अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंदर्भातील निर्णयाकडे जगभरातील बाजारांचे लक्ष लागले आहे. व्याजदरातील बदलाचा थेट परिणाम डॉलर, बाँड यिल्ड आणि त्यातून सोने-चांदीच्या किमतींवर होऊ शकतो.
CME FedWatch Tool नुसार, २५ बेसिस पॉइंट्सच्या दरवाढीची शक्यता ९२ टक्क्यांहून अधिक आहे. व्याजदर वाढल्यास सोन्या-चांदीवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेडच्या निर्णयानंतर मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा मोठी हालचाल होऊ शकते.
मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक महागाईबाबतची चिंता वाढली आहे. तेलाच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी क्रूड ऑइलचा भाव अजूनही सुमारे १०८ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे.
महागाई वाढण्याची शक्यता आणि अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अपेक्षा यामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात पुढील काळातही मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
टीप: वरील दर उपलब्ध बाजार माहितीनुसार दिले आहेत. प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना GST, मेकिंग चार्ज, स्थानिक कर आणि इतर शुल्कांमुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.