Amitabh Bachchan : सेटवर म्हणायचे, तुला काही येत नाही, तू खूंप लंबू आहेस, घरी जा..

अमिताभ बच्चन अनेकदा ‘कौन बनेगा करोड़पति’ शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल किस्से सांगतात.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan : सेटवर म्हणायचे, तुला काही येत नाही, तू खूंप लंबू आहेस, घरी जा..file photo
Published on
Updated on

amitabh bachchan recalls being criticised early in his career you do not know anything

पुढारी ऑनलाईन : अमिताभ बच्चन अनेकदा ‘कौन बनेगा करोड़पति’ शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल किस्से सांगताना दिसतात. आता त्यांनी चित्रपटाच्या सेटवर आपल्याला कशी ओरड पडायची, याचा खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan
Anger Control : छोट्या-छोट्या गोष्टींवर लगेच राग येतो? 'या' उपायांनी स्वतःवर ठेवा कंट्रोल!

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोड़पति’च्या १८व्या सीझनमध्ये दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका विशेष भागात कॉमनवेल्थ गेम्स २०२६च्या सुवर्णपदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहेन, झंडू कुमार, शर्मिला धंकर आणि अस्मिता डे या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधताना बिग बींनी चित्रपटाच्या सेटवरील एक मजेशीर किस्सा सांगितला.

बिग बींना सेटवर पडायची ओरड

‘केबीसी १८’च्या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी झंडू, लव्हलिना, शर्मिला आणि अस्मिता यांच्याशी संवाद साधला. यावेळी अस्मिताने बिग बींना विचारले की, “तुम्हाला कधी सेटवर ओरड पडली आहे का?”

Amitabh Bachchan
Expensive Venom : साप नाही... घराजवळ आढळणाऱ्या 'या' जीवाचे विष जास्त धोकादायक! किंमतही कोटीत

यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “आम्हाला खूप ओरड पडायची. सुरुवातीला तर खूपच ओरड पडली. ‘तुला काहीच येत नाही, तू खूप उंच आहेस, घरी जा,’ असंही सांगितलं जायचं.”

घरी उशिरा गेल्यावर जया बच्चन यांच्या ओरडीपासून कसे वाचतात अमिताभ?

दुसऱ्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारले होते की, ते घरी उशिरा गेल्यावर पत्नी जया बच्चन यांची ओरड खावी लागते का?

यावर बिग बी म्हणाले की, “आम्हाला माहीत असतं की काय होणार आहे. त्यामुळे आम्ही सकाळी उठल्याबरोबर सर्व कुटुंबीयांच्या फॅमिली ग्रुपवर एक मेसेज पाठवतो. हात जोडून नमस्कार करतो आणि लिहितो की, आज आमचं शूटिंग इथे-तिथे आहे, त्यामुळे आज घरी उशिरा येईन. त्यामुळे जेवणासाठी माझी वाट पाहू नका. बस, यामुळे आम्ही वाचतो. पण समजा तुम्ही सांगितलं नाही, तर मग ओरड नक्की पडणार!”

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट

अमिताभ बच्चन शेवटचे ‘वेट्टैयन’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. अनेक वर्षांनंतर दोन्ही दिग्गज कलाकारांनी एकत्र काम केले होते. हा तेलुगू चित्रपट होता.

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन शेवटचे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांसाठी व्हॉइस ओव्हर केले, तर काही चित्रपटांमध्ये स्पेशल अपीयरन्सही दिला.

‘कल्कि 2898 एडी 2’मध्ये दिसणार बिग बी

आता अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ते ‘कल्कि 2898 एडी 2’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास आणि कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत असतील. पहिल्या भागात दीपिका पदुकोणही मुख्य भूमिकेत होती; मात्र आता ती दुसऱ्या भागाचा हिस्सा नसल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news