KGF 2 चे गाणं रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ

KGF 2 चे  गाणं रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: साऊथ अभिनेता यश यांचा आगामी केजीएफ चॅप्टर २ ( KGF 2 ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सध्या त्यातील एक नवे गाणे भेटीस आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

केजीएफ चॅप्टर २ ( KGF 2 ) च्या 'फलक तू गरज तू ' गाण्याचा ३ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्‍ये एक महिला आपल्या तान्ह्या बाळाला झाडाला साडीने बांधलेल्या झोपाल्यात ठेवून शेतात काम करताना दिसत आहे. यावेळी बाळ आईच्या आठवणींने रडताना देखील दिसते. या महिलेसोबत इतर ही अनेक शेतमंजूर काम करताना दिसतात. तर ठेकेदार या मंजूरांना धमकावून त्याच्याकडून काम करून घेताना दिसत आहेत.

महिलेला शेतात काम करत असताना आपल्या बाळाला कुशीत घेता येत नाही. परंतु, ती शेवटी काम संपल्यावर बाळाला मिठी मारताना आनंदीत दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओत ती संतापलेलीही दिसत आहे. या व्हिडिओतील गाण्याचे बोल 'फलक तू गरज तू' असे आहेत. यात कष्टकरी महिलेची व्यथा चित्रपटात दाखविली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. यशने या चित्रपटाचे गाणे मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये लाँच केले आहे. या गाण्याला आतापर्यंत २३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशसोबत या चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन आणि प्रकाश राज यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्तने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील संजय दत्तचा धमाकेदार लूक शेअर झाला होता. संजयचा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला होता.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news