नाशिक : देवळाली कॅम्पला भरदिवसा घरफोडी | पुढारी

नाशिक : देवळाली कॅम्पला भरदिवसा घरफोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : देवळाली कॅम्प येथील नॉव्हेल्टी स्टोअर येथे चोरट्याने दुकानाच्या छताचे कौल व पत्रा काढून घरफोडी केली. चोरट्याने या घरफोडीत ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी भगवान टिकमदास कटारिया (४८) यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने बुधवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास घरफोडी करीत रोकड चोरून नेली.

इंदिरानगरला घरफोडी….

नाशिक : इंदिरानगर येथील शिवदर्शन अपार्टमेंट येथे चोरट्याने घरफोडी करून एक लाख ३९ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ ते ६ एप्रिल दरम्यान घडली. याप्रकरणी रेखा शेषराव बाविस्कर (६२) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने घरफोडी करून घरातील १७ हजार रुपयांची रोकड, चार तोळे सोन्याचे दागिने व इतर चांदीचे दागिने आणि बँकेची महत्वाची कागदपत्रे असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button