image of Hrithik Roshan
Hrithik Roshan surprise for jr ntrInstagram

Hrithik Roshan| हृतिक रोशन 'ज्यु. एनटीआर'साठी 'War-2' सोबत आणणार धमाकेदार बर्थडे सरप्राईझ!

Hrithik Roshan War-2 | हृतिक रोशन ज्यु. एनटीआरसाठी २० मे २०२५ रोजी एक बिग बर्थडे सरप्राईझ घेऊन येत आहे
Published on

Hrithik Roshan surprise for jr ntr War-2 movie

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने सोशल मीडियावर खळबळ उडवत स्पष्ट केलं आहे की तो एनटीआरसाठी २० मे २०२५ रोजी एक बिग बर्थडे सरप्राईझ घेऊन येत आहे – आणि ते देखील ‘वॉर २’ च्या माध्यमातून!

हृतिकने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं: "हे एनटीआर, तुला वाटतंय की २० मे ला काय होणार याची कल्पना आहे? विश्वास ठेव, तुला अजिबातच अंदाज नाही काय येतंय. तयार आहेस का?"

ही पोस्ट पाहताच सोशल मीडियावर वॉर २ ची चर्चा होतेय. ‘वॉर २’मध्ये हृतिक रोशनचा ‘कबीर’ पुन्हा एकदा धडकणार आहे, तर एनटीआर या चित्रपटात पहिल्यांदाच वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे आयन मुखर्जी, ज्याला तरुण आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं.

image of Hrithik Roshan
Dipika Kakar Diagnosed With Liver Tumour | दीपिका कक्कडला लिवर ट्यूमर, शोएब इब्राहिम म्हणाला, 'कॅन्सरची गाठ...'

चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्स ही सध्या भारतीय सिनेमातील सर्वात मोठी आणि यशस्वी फ्रँचाईज आहे, ज्यात ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. ‘वॉर २’ हा या युनिव्हर्समधील सहावा चित्रपट ठरणार आहे.

image of Hrithik Roshan
Kalki Koechlin | 'इथे 1BHK मध्ये राहून ऑडीमध्ये फिरतात', कल्किने उघड केला बॉलीवूड सेलेब्सचा खरा चेहरा!

२० मे ला काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे! हृतिक आणि एनटीआर एकत्र येणार म्हणजे काहीतरी जबरदस्त होणार, याकडे फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news