

Kalki Koechlin reveals how Bollywood stars make Image in the industry
मुंबई : कल्कि कोचलिनने मोठा खुलासा केला आहे की, बॉलीवूड स्टार्स कशा प्रकारे आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रचंड खर्च करतात. आवश्यक गोष्टीचा त्याग करून केवळ आपली प्रतिमा टिकून राहण्यासाठी वन बीएचके फ्लॅटमध्ये राहून ऑडीमध्ये सेलेब्रिटी फिरत असतात, असा दावा कल्किने केला आहे. इतकचं नाही तर, तिने सांगितलं की, अनेकदा ॲवॉर्ड फंक्शनमध्ये स्विफ्ट कारमधून आळ्यानंतर तिला रोखण्यात आले होते.
अभिनय क्षेत्रात उतरल्यानंतर आपली क्षमता, योग्यता सिद्ध करण्यासाठी स्टार्सना वेगवेगळे फंडे वापरावे लागतात. एका मुलाखतीत, कल्कि कोच कोचलिनने खुलासा केला की, तिने स्टार्सना त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी अवास्तव खर्च केल्याचं पाहिलं आहे.
कल्किनेहे देखील सांगितले की, वॉर्ड फंक्शनमध्ये अनेकदा स्टायलिश कारमधून न आल्याने तिला रोखले होते. 'अनेक वर्षे मी माझ्या स्विफ्ट कारमधून ॲवॉर्ड फंक्शनमध्ये जायची आणि माझा ड्रेस कारपेक्षा मोठा असायचा. ते माझ्या कारला त्या सोहळ्यात जाऊ देत नसत. मग त्यांना आमंत्रण पत्रिका दाखवावी लागत असे आणि त्यांना मला माझी ओळख करून द्यावी लागत असे की, मी कोण आहे?'
कल्किने सांगितलं की, याप्रकारच्या अनुभवांनी तिला कधीही आपल्या अटींवर जीवन जगण्यापासून रोखले नाही. मी कोण आहे. ती म्ङमाली, 'मी अशीच आहे आणि मला जीवनात स्वातंत्र्य आणि इतर सर्व काही हवं आहे. मला माझ्या पद्धतीने काम करायला आवडतं. जेव्हा तुमच्यासोबत साथीदार नसेल तर तुम्हाला तुमची ओळख बनवणयासाठी संघर्ष कारवा लागतो. १०० लोक देखील तुम्हाला फॉलो करत नाहीत.
जेव्हा तिला विचारण्यात आले की, कलाकारांसाठी इमेज बनवणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणाली, 'काही मर्यादेपर्यंत हे योग्य आहे. तुम्ही जर एक मोठे कलाकार असाल तर सुरक्षा एक मोठा मुद्दा आहे. तिथे काही लोक वेडे असतात, खासकरून मोठ्या स्टार्सच्या मागे. यासाठी मी काही लोकांसाठी बॉडीगार्ड आणि पीआर ठेवण्याची आवश्यकता समजते.'