

Dipika Kakar Diagnosed With Liver Tumour reveal Shoaib Ibrahim
मुंबई : ससुराल सिमर का फेम टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडला लिवर ट्यूमर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिमने एक नवा व्हिडिओ शेअर करून फॅन्सना दीपिकासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. शोएब इब्राहिमने यूट्यूब चॅनेलवर एका नव्या व्लॉगद्वारे माहिती दिलीय. त्याने दीपिकाच्या आरोग्याबद्दल माहिती दिलीय.
शोएबने सांगितलं की, दीपिकाला पोटात खूप दुखत होतं आणि औषधे घेण्यासाठी सांगण्यात आलं. आम्ही विचार केला की, पोटात इन्फेक्शन झालं. पण दुखणं गेलं नाही आणि स्कॅन केल्यानंतर रिपोर्टमध्ये समजलं की, तिच्या लीवरमध्ये ट्यूमर आहे. डॉक्टरांनी ट्यूमर कॅन्सर आहे का, हे तपासण्यासाठी पुढील टेस्ट करण्याचा सल्ला दिला. पण, खूप आभारी आहे की, रिपोर्ट निगेटिव आला. कोणतेही कॅन्सर सेल्स आढळले नाही. परंतु, आणखी काही चाचण्या अद्याप होणे बाकी आहेत. त्यासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले जाईल.
शोएबने सांगितलं की, ट्यूमर करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. माहितीनुसार, दीपिका तीन दिवसांपासून टेस्ट साठी रुग्णालयात आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
दीपिका कक्कड सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. परंतु, खांद्याच्या आजारामुळे तिला शो सोडावा लागला होता. दीपिका कक्कड एक टीव्ही अभिनेत्री आहे. काही महिनियांपूर्वी तिने तिचे क्लोदिंग ब्रँड लेबल सुरू केलं होतं. नंतर वृत्तस समोर आले होते की, क्लोदिंग ब्रँड बंद झालं आहे. पण नंतर शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एका सेशनमध्ये स्पष्ट केलं की, हे वृत्त खोटे आहे.