BB 15 : devoleena चा सुटला कंट्रोल, पँटमध्येच लघुशंका

deoleena Bhattacharjee
deoleena Bhattacharjee
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

'बिग बॉस १५' लवकरच फिनालेपर्यंत पोहोचेल. याआधी सर्व कंटेस्टेंट्स तिकिट टू फिनाले टास्कमध्ये आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. मागील काही दिवसांपासून टास्क रद्द होत होता. यावेळी कुणीही संधी घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. पण यावेळी टास्कमध्ये विचित्र डेडिकेशन पाहायला मिळालं. देवोलीना भट्टाचार्जी ( devoleena) आणि रश्मी देसाई यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. विशेष म्हणजे देवोलिना (devoleena) हिच्यासोबत असं काही घडलं की…

२४ तासांहून अधिक पोलवर

टास्कवेळी भट्टाचार्जी-रश्मीला एका पोलला धरून उभं राहायचं होतं. अधिकाधिक तास येथे उभं राहायचं होतं. टास्कमध्ये भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई दोघांनी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं. दोघी २४ तासांहून अधिक वेळ एकाच पोलला धरून उभ्या राहिल्या. त्यांना त्या जागेवरून हटवण्यासाठी लोकंनी त्यांना अनेक प्रकारे टॉर्चर केलं. प्रतीकने रश्मीला आणि उमरने भट्टाचार्जीला सर्वाधिक टॉर्चर केलं. परिस्थिती ही झाली की, दोघीही आपल्या जागेवरून अजिबात हलल्या नाहीत. इतकंच नाही की, लघुशंकेला जाण्यासाठीही त्या जागेवरून हलल्या नाहीत. परिणामी, भट्टाचार्जीने आपल्या पँटमध्ये लघुशंका केली.

भट्टाचार्जीने लघुशंका केल्यानंतर तिच्यावर बादली भरून पाणी फेकायला प्रतीकला सांगितले. प्रतीकने तिच्यावर पाणी फेकलं. पण इतकं सर्व करूनदेखील भट्टाचार्जी हारली. कारण, टास्कवेळी निशांतने भट्टाचार्जीच्या पायांवर बादली भरून पाणी ओतलं. त्यामुळे ती घसरली. त्यानंतर रश्मी जिंकली.

सोशल मीडियावर ट्रोल

भट्टाचार्जी आणि रश्मी २४ तासांहून अधिक काळ पोलला पकडून उभ्या राहिल्या. अशात राखी सावंतने दावा केला की, दोघींनी रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर सोशल मीडियावर लोक ट्रोलही करत आहेत. प्रसिध्दीसाठी काहीपण असे म्हणत टीका केली जात आहे. टास्क संपल्यानंतर भट्टाचार्जीची तब्येत बिघडली. प्रतीक तिची देखभाल करताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news