पुढारी ऑनलाईन
अभिनेता कार्तिक आर्यनची स्वतंत्र अशी फॅन फॉलोईंग तर आहेच; पण त्यातही फीमेल फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. अनेक मुली कार्तिकसाठी अक्षरशः वेड्या आहेत. त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहेत. याचा प्रत्यय नुकताच आला. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
झाले असे की, कार्तिकच्या घराबाहेर दोन तरुणी कार्तिकचे नाव घेत जोरजोरात ओरडून कार्तिकला घराबाहेर येण्याचे आवाहन करत होत्या. या तरुणी कोलकाताहून खास कार्तिकला पाहण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. अखेर या मुलींना भेटण्यासाठी कार्तिकही गेटपर्यंत आला.
त्याने या मुलींशी संवादही साधला. त्यांच्यासोबत फोटोही काढले. त्यामुळे या मुलींना आकाश ठेंगणे झाल्याची अनुभूती मिळाली. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. कार्तिकने या भेटीच्या व्हिडीओमध्ये कॅप्शन दिली आहे की, याच प्रेमासाठी मी जगतो. हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. माझ्या सर्व फॅन्समुळे मी धन्य झालो आहे.