पुढारी ऑनलाईन
जेनेलिया देशमुखने इन्स्टाग्रामवर सलमानसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. Salman Khan चा ५६ वा वाढदिवस २७ डिसेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्ताने जेनेलिया देशमुखने सुपरस्टारसोबत डान्स केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर सलमानसोबत एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये दबंग खान आणि सलमानने मरून रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. दोघेही डान्स करताना दिसत आहेत.
जेनेलिया देने इन्स्टाग्रामवर सलमानसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघे मरून रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ सलमान खानच्या फॉर्महाऊसचा आहे. या फॉर्महाऊसवर बर्थडे पार्टी होती. व्हिडिओ पाहून वाटत आहे की, सलमान खानची बर्थडे पार्टी खूप शानदार होती.
व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने म्हटलं की, सर्वात मोठं मन असणाऱ्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. परमेश्वर, तुम्हाला आनंदात ठेवो. चांगलं आरोग्य देवो. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आज भाईचा बर्थडे आहे. @beingsalmankhan
सलमान खानला वाढदिवसाच्या निमित्ताने कॅटरीना कैफनेदेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅटरीनाने एक मोनोक्रोम फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की- सलमान खान हॅप्पी बर्थडे टू यू. खूप सारं प्रेम, प्रकाश आणि ब्रिलिएंस नेहमी आपल्यासोबत राहो. मॅसेजसोबत कॅटरीनाने हार्ट इमोजीदेखील शेअर केलीय.
सुपरस्टार सलमान खानने आपला ५६ वा वाढदिवस साजरा केला. इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. सलमानने सर्वांचे आभारदेखील मानले.
हेही वाचलं का?