बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल हिच्या वडिलांवर गोळीबार

शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार झाला
शहनाज गिलच्या वडिलांवर गोळीबार झाला
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गिल ही सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत आहे. ती आपले सामान्य जीवन जगत आहे. दरम्यान, शहनाज गिल यांचे वडील संतोख सिंह सुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. संतोख सिंह सुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,  अमृतसरमधील जंडियाला गुरु परिसरात कार एका बाजूला लावून सुरक्षारक्षक गुरदासपुरियच्या ढाब्याजवळ गेले होते. त्यांनी सांगितलं की, तेव्हा दोन लोक बाईकवर स्वार होते. ते कारजवळ थांबले. त्‍यांनी संतोख सिंह सुख यांच्यावर गोळीबार केला. हल्‍लेखाेरांनी चार  गोळ्या झाडल्या.

सुदैवाने बचावले संतोख सिंह

संतोख सिंह (Santokh Singh) घटनेवेळी आपल्या गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत होते. या घटनेत ते सुदैवाने वाचले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. शनिवारी ते एका कार्यक्रमासाठी अमृतसरहून ब्यास जात होते. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी गोळ्यांचा आवाज ऐकून हल्लेखोरांवर विटा फेकल्या. तेव्हा ते तेथून पळून गेले. त्यांनी तत्काळ जंडियाला गुरु पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली.

संतोख सिंह यांचा आरोप

सिंह यांनी आरोप केला की, पोलिसांना घटनेबद्दल वेळेत कळवलं होतं. परंतु, तरीही गुन्‍हा  दाखल करण्‍यात आला नाही. याप्रकरणी जंडियाला गुरु पोलिस स्टेशनच्य़ा स्टेशन हाऊसचे अधिकारी हरप्रीत सिंह यांनी म्हटलं की, पोलिसांनी घटनास्थळाहून चार मोकळी खोकी जप्त केली. त्यांनी सांगितलं की. 'प्रारंभिक तपासात काही गोष्टी संशय़ास्पद आढळल्या आहेत. तपास सुरू आहे.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news