पुणे : नवले पुल परिसरात पुन्हा एकदा अपघात; तीन ठार एक गंभीर | पुढारी

पुणे : नवले पुल परिसरात पुन्हा एकदा अपघात; तीन ठार एक गंभीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील नवले पुल परिसरात मोठा अपघात झाला असून, त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. एक गंभीर जखमी झाला आहे. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुंबईहून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले. आणि कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली.

यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अद्याप मृतांचा अथवा जखमींचा नेमका आकडा समोर आला नाही. परंतु या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जाते आहे. अपघातामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांब रांगा लागल्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Back to top button