माधुरी दीक्षित हिने शेअर केला सलमान सोबतचा 'तो' सुंदर फोटो | पुढारी

माधुरी दीक्षित हिने शेअर केला सलमान सोबतचा 'तो' सुंदर फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क

सुपरस्टार, मेगास्टार, भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर सलमान खानवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. फॅन्स सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या यादीत आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षित हिच्यासह अनेक दमदार, दिग्गज स्टार्स त्याला शुभेच्छा देत आहेत.

माधुरी दीक्षित शिवाय सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, आयुष्मान खुराना यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहिलीय. शिल्पा शेट्टी आणि सलमानची पहिली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननेदेखील विश केलं. सलमान खान यावेळी खूप चर्चेत आहे. कारण, त्याला सर्पदंश झाला आहे. पण, तो विषारी साप नव्हता. साप चावल्यानंतर सलमानला तत्काळ रुग्णालयात आणण्यात आले आणि उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, २७ डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस असल्याने अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये माधुरी दीक्षितने सलमानसोबतचा एक आपला फोटो ट्विटरवर शेअर केलाय. यसोबत तिने सलमानला शुभेच्छा देत म्हटलं की… इंडस्ट्रीच्या हृदयाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अपेक्षा करतो की तुझे पुढचे वर्षदेखील दबंग राहो.(Birthday greetings to the heartthrob of the industry @BeingSalmanKhan. Wishing you a dabangg year ahead Partying face)

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाने सलमान खानचा एक फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सलमानच्या पोझची नक्कल केलीय.

सिद्धांत चतुर्वेदी

गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीने सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने एक फोटो शेअर केला होता, यामध्ये ती बिग बॉसच्या सेटवर दिसली होती.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी सलमान खानची चांगली मैत्रीण आहे. तिने सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भाग्यश्री पटवर्धन

सलमानची पहिल्या अभिनेत्रीने काही फोटोज पोस्ट करत सलमानला वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच ती बिग बॉसच्या घरात पोहोचली होती.

राज बब्बर

अभिनेता राज बब्बरने सलमानला विश केलं आहे. त्यांची पोस्टदेखील लोकांच्या पसंतीस उतरतेय.

अली अब्बास जफर

टायगर जिंदा हैचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानचा एक फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅटरीना कैफ, लारा दत्ता, रविना टंडन यांनीही त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button