मैं खाकी हूं: विश्वास नांगरे पाटील यांचा कविता वाचतानाचा व्हिडिओ व्हायरल, ऐकून यूजर्स झाले भावूक

मैं खाकी हूं: विश्वास नांगरे पाटील यांचा कविता वाचतानाचा व्हिडिओ व्हायरल, ऐकून यूजर्स झाले भावूक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: छत्तीसगडचे आयपीएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केलेली एक हिंदी कविता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ लोकांना भावूक करत आहे, तसेच लोक जवान आणि सुरक्षा दलांच्या आत्म्याला सलाम करत आहेत. खरंतर अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या क्लिपमध्ये मुंबई शहराचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आयपीएस अधिकारी सुकृती माधव मिश्रा यांनी लिहिलेली कविता वाचताना दिसत आहेत. अवनीश शर्माने आपल्या ट्विटरवर हे शेअर करत लिहिले की, मी जेव्हाही वाचतो किंवा ऐकतो तेव्हा माझे हृदय उत्साहाने भरते. अवनीशचा हा व्हिडिओ रिट्विट करताना सुकृती माधव मिश्राने त्याचे आभार मानले आहेत. मेरठ येथील जिल्हा प्रशिक्षणादरम्यान आपल्या सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ आपण ही कविता लिहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

खाकी म्हणजेच जीवन

खाकीच्या नावावर जीव देणार्‍या प्रत्येक माणसाच्या तळमळीचा या कवितेत उल्लेख आहे. दिवस असो वा रात्र, दिवाळी असो की होळी, कडक ऊन असो वा पाऊस, प्रत्येक क्षणी देशाच्या सेवेसाठी उभे राहणार्‍या सैनिकांबद्दल आहे. या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ रिट्विट करत एका यूजरने लिहिले की, "काय छान लिहिलंय आणि वाचकही अप्रतिम आहेत. मी खूप दिवसांपासून एका महान कवीच्या शोधात होतो, जो आज मला सापडला आहे." व्हिडिओवर टिप्पणी करताना दुसर्‍या युजरने लिहिले, "जी तुम्ही अप्रतिम पेनाने अप्रतिम शब्द कोरले आहेत… अगदी क्लासिक."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news