nora fatehi : नोराच्या कारची रिक्षावाल्याला धडक, लोकांनी घातला घेराव | पुढारी

nora fatehi : नोराच्या कारची रिक्षावाल्याला धडक, लोकांनी घातला घेराव

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या ( nora fatehi ) कारने एका ऑटोरिक्षाला धडक दिली. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने अपघातावेळी नोरा आपल्या कारमध्ये नव्हती. परंतु, तिचा ड्रायव्हर कार चालवत होता. याच दरम्यान नोरा पंजाबी गायक गुरु रंधावासोबत ‘डान्स मेरी रानी’ या नवीन गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात पोहोचली होती.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, नोरा ( nora fatehi ) गुरु रंधावासोबत ‘डान्स मेरी रानी’ या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात पोहोचल्यानंतर परत येत असताना तिचा कारला अपघात झाला. कारच्या ड्रायव्हरने ऑटोरिक्षाला धडक दिली. यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी कारला घेरावा घातला.

यावेळी कार ड्रायव्हर आणि लोकांच्यात वादावादी झाल्याने ड्रायव्हरने ऑटोवाल्याला १००० रुपये दिले. यानंतर जमलेल्या लोंकांनी ड्रायव्हरला सोडून दिले. सुदैवाने नोरा या अपघातावेळी कारमध्ये नव्हती. या दरम्यान नोरा आणि गुरु रंधावा नविन गाण्याच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.

सध्या नोराचे ‘डान्स मेरी रानी’ या गाणे चर्चेत आले असून यातील ‘जलपरी’ चा लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. याआधी तिच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्याने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. याशिवाय नोरा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळेही चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिसनंतर नोराचे नाव सुकेश चंद्रशेखरसोबत जोडले गेले. सध्या नोराने ईडीला मदत करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे अनेक खुलासे उघड होणार आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button