Dombivli : बायकोला खूश ठेवण्यासाठी चोरल्या गाड्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

Dombivli : बायकोला खूश ठेवण्यासाठी चोरल्या गाड्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीला खुश ठेवण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी चक्क दुचाकी चोरून भंगारात विकण्याचा मार्ग अवलंबणाऱ्या आणि आपल्या बरोबर इतरांनाही सहभागी करून घेणाऱ्या दीपक सलगरे याच्यासह पाच जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. (Dombivli)

विशेष म्हणजे यावेळी चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या सामान्य ग्राहकांनी आधी कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यानंतर दुचाकी खरेदी करावे अन्यथा चोरीच्या गाड्या खरेदी केल्याचा गुन्हा सामान्य ग्राहकांवर लावण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.

दीपक सलगरे याने प्रेमविवाह केला होता. त्यांनतर मौज मजा करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. नेमकी हीच गरज ओळखून त्याने दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी बाजार पेठ पोलीस ठाणे, डायघर पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे, कल्याण पोलीस ठाणे अशा विविध पोलीस हद्दीत विविध ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी चोरी करण्याचा तगादा लावला होता. (Dombivli)

गाड्या चोरी करून पळवून द्यायच्या आणि त्यानंतर पलावा येथे राहणाऱ्या राहुल याला विक्री करणे किंवा भंगारवाल्या मित्राकडे देऊन त्याचे पार्ट काढून त्यांची कमी दरात विक्री करणे अशापद्धतीचे गुन्हे तो आणि त्याची मित्र मंडळी करत होते.

आठ लाखांच्या दुचाकी तसेच भंगारातील विविध पार्ट आणि ज्या कटरने गाड्यांचे पार्ट वेगळे केले जात असे ते कटर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपकसह राहुल डावरे, भंगार व्यवसाय करणारे चीनवन चव्हाण उर्फ बबलू धर्मदेव चव्हाण, समशेर खान, भैरवसिंग खरवड या आरोपींना अटक केली आहे.

पहा व्हिडिओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद

Back to top button