सारा खानला स्वयंवरात हवेत 'रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल' - पुढारी

सारा खानला स्वयंवरात हवेत 'रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल'

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच ती यासाठी करण जोहरच्या शोमध्ये सहकलाकार धनुषसोबत सहभागी झाली होती. यावेळी बोलताना सारा म्हणाली की, ‘मला स्वयंवर करायचे आहे. स्वयंवरात इतर कुणी असो नसो; पण चार पुरुष असले पाहिजेत. ते म्हणजे रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, विकी कौशल आणि वरुण धवन.’

साराचे हे म्हणणे ऐकून करणला हसू आवरता आले नाही. तो म्हणाला, ‘त्यांच्या पत्नी हा शो पाहत असतील.’ त्यावर सारा म्हणाली की, ‘मी लग्‍नासाठी तयार आहे; मात्र मला असा पती हवा आहे जो आई अमृतासोबत राहील. म्हणजेच त्याने घरजावई बनून राहावे.’

Back to top button