विदिशा श्रीवास्तव : काशीबाई बाजीराव बल्लाळ फेम अभिनेत्री इतकी ग्लॅमरस | पुढारी

विदिशा श्रीवास्तव : काशीबाई बाजीराव बल्लाळ फेम अभिनेत्री इतकी ग्लॅमरस

पुढारी ऑनलाईन डेस्क

टीव्ही मालिका काशीबाई बाजीराव बल्लाळमध्ये एकापेक्षा एक सुंदर कलाकार दिसत आहेत. यापैकीचं एक म्हणजे अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव होय. या मालिकेत अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव हिने शिवूबाईंची भूमिका साकारलीय. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतलीय. शिवूबाईंच्या भूमिकेत दिसणारी ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे.

एका वेबसाईटशी बोलताना तिने सांगितले होते की, मेकअप आणि लुकसाठी तिने अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. ती म्हणाली, या मालिकेसाठी ती मराठी भाषा शिकली. याशिवाय, तिने त्यावेळच्या महिला कशा उठायच्या, कसा बसायच्या. या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. शिवूबाई श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्यामुळे खूप सारे दागिने तिने घातलेले असतात.

विदिशाने ए हैं मोहब्बते मालिकतही काम केलं आहे. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे २८ एप्रिल, १९८६ रोजी झाला. तिने बिझनेस मॅनेजमेंटशिवाय बायोटेक्नॉलजीचा कोर्सदेखील केलाय. पण, विदिशाला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे तिने आपले शिक्षण पूर्ण करून मॉडलिंग केले.

तिने केवळ हिंदी टीव्ही इंडस्ट्री नव्हे तर साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवलय. २००७ मध्ये तिने चित्रपटांमध्ये करिअरला सुरुवात केली. तिने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलंय. विदिशा ‘टीव्हीची यामी गौतम’दखील म्हटलं जातं. कारण, ती बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसारखी दिसते.

‘ये है मोहब्बतें’ मधून टीव्ही डेब्यू

२०१७ मध्ये विदिशाने टीव्ही मालिका ‘ये है मोहब्बतें’ मधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. यामध्ये ती इशिताच्या सुनेच्या भूमिकेत होती.

विदिशाने ‘ये जादू है जिन्न का’, ‘तुझसे है राब्ता’, ‘मेरी गुडिया’ आणि ‘श्रीमद भगवत महापुराण’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. ‘कहत हनुमान जय श्रीराम’ मध्ये तिने देवी पार्वतीची भूमिका साकारली होती.

ती एक सोशल मीडिया लव्हर आहे आणि इन्स्टाग्रामवर आपले स्टायलिश आणि बोल्ड फोटो शेअर करते. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगरदेखील आहे.

या साऊथ चित्रपटांमध्ये झळकली विदिशा 

तेलुगु चित्रपट : अभिमानी (२००५)

कन्नड चित्रपट : आय डोंट स्टॉप इट (२००७)

तमिळ चित्रपट : कथावारायण (२००८)

मल्याळम चित्रपट : लकी जोकर्स (२०११)

टीव्ही : ये है मोहब्बतें (२०१७)

Back to top button