bbm :मीनल-विकास यांच्यामध्ये टास्कवरून जोरदार राडा, टीम B मध्ये फूट

bbm 3 : vikas and minal
bbm 3 : vikas and minal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारपासून तिकिट टू फिनाले मिळवण्यासाठीचा टास्क सुरू झाला आहे. प्रत्येक टीम १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, टीम B मध्ये सगळं नीट सुरू नाहीये, असे दिसून येतं आहे. विशाल आणि विकास मीनलवर नाराज आहेत. तर मीनल-विकासमध्ये टास्कवरून जोरदार राडा होणार आहे. ज्यामध्ये विकास असं देखील बोलून दाखवणार आहे कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नकोस. आणि नंतर वादाला सुरूवात झाली. आजदेखील विशाल – विकास यावर चर्चा करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या ग्रुपमध्ये आता फूट पडल्‍याचे दिसते आहे.

मीनलचे म्हणणे आहे, एवढं मनापासून खेळले आहे मी या लोकांसाठी, मी काय एकटी survive नाही करू शकतं. विकास विशालला सांगताना दिसणार आहे. या घरात प्रत्येकजण एकटं survive करू शकतं.

आपल्या ग्रुपमध्ये करुचं शकतं. मीनल दुसरीकडे म्हणताना दिसणार आहे, माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला आहे. विशालचे म्हणणे, प्रत्येकाने केले; पण तू बोलून दाखवलं याला काही अर्थ नाही. कशाला मग ग्रुप ग्रुपचं नाटकं करायचं.

या सदस्यांमध्ये पुढे काय चर्चा झाली ते आजच्या भागात पाहाबिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news