मनसेच्या रूपाली पाटील राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत? | पुढारी

मनसेच्या रूपाली पाटील राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत?

  • पुणे : पुढारी वृत्तसेवा : मनसेतील स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे आज जाहीर केले. भविष्यात कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित केले नसल्याचे त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांशी आपण बोललो होतो. त्याच्याकडून ऑफर आली, तरी मी अद्याप माझा निर्णय घेतलेला नाही, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

‘भूमीअभिलेख’च्या परीक्षा होणारच; टोळक्यांची फसवेगिरी केली ‘लॉक’

त्या म्हणाल्या, मनसेमध्ये 14 वर्षे काम केले असल्यामुळे मी कोणाबद्दल कसलीही तक्रार केली नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे माझे दैवत होते व पुढेही राहतील. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आले. त्यामुळे मनसे व मनसैनिक यांच्याबाबत मी वाईट बोलणार नाही . पक्षातील काही स्थानिक लोकांच्या त्रासाबद्दल मी माझे मुद्दे ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविले होते. शेवटी पक्षातील इतरांत बदल होत नसेल, तर आपण बदलायला हवे, असे ठरवून हा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.

पर्यावरणसंबंधित खटल्यांत पुणे न्यायपीठ देशात मागे

पक्षाबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांना काल मी मुंबई भेटले. मात्र पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रूपाली पाटील यांनी सांगितले. पक्षाने मला सन्मान आणि पदे दिली , त्यामुळे तो माझा वादाचा मुद्दाच नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leena Nair : अभिमानास्पद! कोल्हापूरच्या लीना बनल्या फ्रान्स लग्झरी ग्रुप Chanel च्या सीईओ

रूपाली पाटील यांनी पक्ष सोडल्या मुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून पक्ष त्याग केला, त्यामुळे मनसेत खळबळ उडाली. मनसेतील काही नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे त्यात बदल न झाल्यास मनसेला भविष्यकाळात आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आजपासून पक्षातील शहरातील पदाधिकारी वगळून स्थानिक कार्यकर्त्यांची थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

एमपीएससीच्या मुलाखत यादीत मृत स्वप्निल लोणकर यांचे नाव

 

Back to top button