दीपिका म्हणते, रणवीर मजेत असतो, मी त्याला बदलू शकत नाही! | पुढारी

दीपिका म्हणते, रणवीर मजेत असतो, मी त्याला बदलू शकत नाही!

पुढारी ऑनलाईन : ‘दीपवीर’ हे बॉलीवूडचे सर्वाधिक चर्चेत असणार्‍या कपल्सपैकी एक. दोघांच्याही चाहत्यांची संख्या मोठी. नुकतेच दीपिका पदुकोणने त्यांच्या लग्नाबाबतच काही खुलासे एका मुलाखतीतून केले आहेत.

रणवीर खूप संवादी आहे. जे गरजेचेही आहे. यामुळे वैवाहिक जीवन सोपे हाेते. सहमती, असहमती कळते. आमच्यातही काहीवेळा भांडणे होतात. मी रणवीरला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. मी त्याला अंतर्बाह्य बदलू शकत नाही किंवा त्याला बदलले पाहिजे, हेही माहीत नाही; पण तो मजेत असतो. ते चांगलेच आहे, असे  दीपिकाने म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपिकाने इन्स्टाग्रामवरून रणवीरबाबत लिहिले होते की, यापेक्षा जास्त अ‍ॅट्राक्टिव्ह कुणीही असू शकत नाही.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button