

मुंबई; पुढारी ऑनलाईन
ओरिजनल नेटफ्लिक्स सीरिज 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait ) नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. 'सेक्रेड गेम्स' या चित्रपटात कुब्राने गाजलेली 'कुक्कू'च्या भूमिकेने वेगळे स्थान निर्माण केले होते. सध्या कुब्राने पाण्यात अंडरवॉटर केलेले फोटोशूट शेअर करून सोशल मीडियात आग लावली आहे.
नुकतेच कुब्रा सैत (Kubbra Sait ) हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर पाण्यातील अंडरवॉटर फोटोशूट करून चाहत्यांना भारावून सोडले आहे. यावेळी कुब्राने काळ्या आणि निळ्या रंगाची बिकीनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. याशिवाय तिने आणखी एका अंडरवॉटर फोटोशूटमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोशूटमधील खास म्हणजे, कुब्राने आपल्याच प्रतिमला किस केले आहे. या फोटोत कुब्राचा चेहरा स्पष्ट दिसत नाही परंतु, तिच्या फिगरचे चाहत्यांनी कौतुक केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुब्राने Schrodinger's Cat असे लिहिले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एकाने पाण्यात आग लावली. तर दुसऱ्याने परफेक्ट फिगर असे म्हटले आहे. याशिवाय आणखी एकाने आम्हाला जिवंत राहू दे अशी कॅप्शन लिहिली आहे. याशिवाय चाहत्यांनी या फोटोंवर फायरचा ईमोजी शेअर केला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या 'सेक्रेड गेम्स'मधील भूमिका साकारणे सोपे नव्हते. यातील न्यूड सीन साकारताना मी नर्व्हस झाले होते असे कुब्राने एका मुलाखतीत सांगितले होते. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सैफ अली खान, राधिका आपटे यांच्या भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचलंत का?