Corona Alert : देशातील १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढला !

Corona Alert : देशातील १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढला !
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या वाढत्या दहशतीदरम्यान (Corona Alert) राज्य सरकारांना सतत इशारा दिला जात आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लिहिलेल्या पत्रात १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रात राज्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

Corona Alert : कठोर देखरेख आवश्यक

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना हे पत्र लिहिले आहे. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत या १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्याची गरज केंद्र सरकारने राज्यांना सांगितली आहे.

Corona Alert : या राज्यांसाठी दिला इशारा

केंद्राने जाहीर केलेली यादी दोन भागात आहे. यामध्ये पहिल्या भागात ज्या जिल्ह्यांचा संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात तीन राज्यांतील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. मिझोराम, केरळ आणि सिक्कीम अशी या राज्यांची नावे आहेत. त्याच वेळी, केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडमधील इतर जिल्हे समाविष्ट आहेत, जिथे संसर्ग दर ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

सर्व आवश्यक पावले उचला

केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रात या राज्यांना असेही सांगण्यात आले आहे की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज आहे. या अंतर्गत, ओळखल्या गेलेल्या भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच कोविड क्लस्टर, नाईट कर्फ्यू सोबतच मोठ्या संख्येने लोकांचे एकत्र येणे थांबवण्यासही सांगण्यात आले आहे. यासोबतच विवाह समारंभ आणि अंत्यसंस्काराच्या वेळी लोकांची संख्या निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही पत्रात म्हटले आहे.

या सूचना राज्यांना दिल्या आहेत

  • आरटी पीसीआर चाचणी वाढवण्यावर भर
  • परदेशातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात निष्काळजी राहू नका
  • संक्रमित रूग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी आणि निरीक्षण केले पाहिजे
  • सर्व राज्यांनी कोविड दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जारी कराव्यात

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news