Naaz Joshi : आम्हीही माणूस आहोत; ट्रान्ससेक्शुअल मॉडेलची पोस्ट व्हायरल | पुढारी

Naaz Joshi : आम्हीही माणूस आहोत; ट्रान्ससेक्शुअल मॉडेलची पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस शुक्रवारी  ( दि. १०)  झाला. यानिमित्त नाझ जोशी या मॉडेलने ‘चंदीगढ करे आशिकी’या सिनेमासह एकुणच मानवाधिकारांबाबत व्यक्त केलेल्या भावना व्हायरल झाल्या आहेत. नाझ जोशी स्वत: ट्रान्ससेक्शुअल ही स्वत:ची लैंगिक ओळख अभिमानाने मिरवत ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करते. ती एक यशस्वी मॉडेल आहे.

‘चंदीगढ करे आशिकी’ या नव्याने आलेल्या सिनेमानिमित्त नाझने भावना व्यक्त करताना म्हटले आहे. ‘वाणी कपूर या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका करते आहे याचा मला अभिमान वाटतो. ही बदलाची वेळ आहे. तुम्ही सगळे मला आगामी सिनेमा ‘रिव्हेंज’ मध्ये सिस जेंडरच्या भूमिकेत नक्की पहा.’

नाझने आज ‘मानवाधिकार दिनानिमित्त म्हटले आहे, ‘ट्रान्सजेंडर आणि ट्रान्ससेक्शुअल व्यक्तींमध्ये खूप अंतर असते. मला ट्रान्ससेक्शुअल महिला सेलिब्रिटी असल्याचा अभिमान वाटतो. अगदी राखेपासून ते लखलखीत श्रीमंतीपर्यंत सगळं काही मी पाहिलं आहे. जन्मदात्या आईनं मला मारण्याचा प्रयत्न केला आणि ट्रान्स लोकांनी माझा जीव वाचवला. आम्हीही माणसे आहोत. आम्हाला सन्मान द्या, तुम्हालाही बदल्यात सन्मान मिळेल.’

नाझने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. यंदाचा ‘इंप्रेस अर्थ 2021-22’ चा खिताबही तिने जिंकला आहे. नाझने केलेले ‘कू’ व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by NAAZJOSHI (@naazjoshi)

 

View this post on Instagram

 

A post shared by NAAZJOSHI (@naazjoshi)

 

View this post on Instagram

 

A post shared by NAAZJOSHI (@naazjoshi)

Back to top button